महिला पोलिस कॉन्स्टेबलला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
महिला पोलिस कॉन्स्टेबलला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबलने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिला सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवण्यात आले होते.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव रामचंद्र आंबर्डकर असून पंत नगर पोलिस ठाण्यात आयपीसी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील संदेश पाठवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
COMMENTS