आमदार लंकेंकडून आळेफाटा चौकातील वाहतूक कोंडी दूर / बाह्यवळणावरून वाहतूक सुरू होण्याची प्रतीक्षा पारनेर | नगर सह्याद्री - नगर कल्याण राष्ट्र...
आमदार लंकेंकडून आळेफाटा चौकातील वाहतूक कोंडी दूर / बाह्यवळणावरून वाहतूक सुरू होण्याची प्रतीक्षा
पारनेर | नगर सह्याद्री -
नगर कल्याण राष्ट्रीय महामार्ग व नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्ग जुन्नर तालुयातील आळेफाटात या मुख्य ठिकाणी मिळत असुन चारही बाजूंनी वाहतूक कोंडी हा नित्याचा विषय बनला आहे. दरम्यान याचा फटका सर्वसामान्यांना बसु नये म्हणून रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके हे आळेफाटा (ता. जुन्नर) या ठिकाणी एका कार्यक्रमाला आले असता आळेफाटा येथील चौकात ट्रॅफिक झाल्याने त्यांनी स्वतः गाडीतून खाली उतरुन जवळपास अर्धा ते एक तास थांबून पोलिसांना ट्रैफिक सोडविण्यासाठी मदत केली. त्यामुळे एक लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्याचे चांगले काम करतो. याचे चित्रीकरण त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अनेक प्रवाशांनी करत सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. दोन्ही महामार्ग याठिकाणी मिळत असल्याने आळेफाटा येथील चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होवून वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
आळेफाटा हे नगर - कल्याण व पुणे - नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून येथील चौकात नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यातच सध्या लग्नसराई सुरू असल्याने या ठिकाणी दररोज ट्रैफिक होऊन वाहनांच्या रांगा लागत आहेत. मात्र येथील पोलीस प्रशासन अपुर्या कर्मचारी आपले कर्तव्य चोख बजावत आहे. उन वारा पाऊस याची तमा न बाळगता वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहे. यामध्ये विशेष करुन आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, कॉन्स्टेबल फलके, ताजणे व इतर सर्वच स्टाफ सकाळी ७ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे कर्तव्य बजावताना दिसतात.त्यामुळे काहीसा दिलासा वाहतूक प्रवाशांना मिळाला आहे. आळेफाटा बाह्य वळण रस्ताचे काम अंतिम टप्यात असून बायपास शेजारील सब रस्ता खुला केल्यास कमीत कमी नाशिक-पुणे महामार्गातील वाहतूक काही प्रमाणात नियंत्रणात येण्यास मदत होऊ शकेल अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार रस्त्यावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके हे महाराष्ट्राभर व जिल्हात विविध कार्यक्रमा निमित्ताने दौरे करत असतात. परंतु अनेक ठिकाणी त्यांना वाहतूक कोंडीचा अनुभव आला तर आमदार नीलेश लंके व त्यांचे शासकीय सुरक्षारक्षक पोलिस कॉन्स्टेबल अमोल धामणे व कार्यकर्त्यांना बरोबर घेत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेताना व्हिडिओ व्हायरल झाले आहे. तर अनेक वेळा नगर पुणे महामार्गावर व नगर शहरा मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ते रस्त्यावर उतरताना दिसत असुन त्यांच्या या सामाजिक कामाचे कौतुक होत आहे.
COMMENTS