पारनेर | नगर सह्याद्री - तालुयातील कर्जुले हर्या येथील दिपक उंडे बेपत्ता प्रकरणाशी माझा किंवा कुटुंबातील सदस्यांना कोणताही संबंध नसुन या प्...
पारनेर | नगर सह्याद्री -
तालुयातील कर्जुले हर्या येथील दिपक उंडे बेपत्ता प्रकरणाशी माझा किंवा कुटुंबातील सदस्यांना कोणताही संबंध नसुन या प्रकरणाच्या चौकशीसाठी माझ्यासह उंडे परिवाराचीही नार्को टेस्ट करा अशी मागणी डॉ. प्रदीप दाते यांनी लेखी निवेदनाद्वारे नाशिक विभागाचे पोलिस महासंचालक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केली आहे.
शुक्रवार दि. १२ मे २०२३ रोजी नाशिक विभागाचे पोलिस महासंचालक व जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनानुसार पारनेर तालुयातील कर्जुले हर्या येथील शिवसेना कार्यकर्ता दीपक उंडे गेल्या पाच महिन्यांपासून गायब झालेला असल्याने उंडे परिवाराने डॉ. प्रदीप दाते यांच्यावर केलेले आरोप धंदात खोटे असल्याचे म्हटले आहे.
या निवेदनात डॉ. दाते यांनी म्हटले आहे की या गुन्ह्यात माझा काडीमात्र संबंध नसून फक्त राजकीय व वैद्यकीय कारकीर्दीस गालबोट लावून मला व कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. माझ्याविरुद्ध पारनेर येथील पोलीस स्टेशनला राजकीय सूडबुद्धीतून खोटी तक्रार दाखल केलेली असून या तक्रारीची सत्यता पडताळल्याशिवाय माझ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊ नये. तसेच माझ्यासह दीपक उंडे यांच्या कुटुंबीयांचीही नार्को टेस्ट करावी जेणेकरून त्यांना माझे विरुद्ध खोटे अर्ज तयार करून, मला कट कारस्थान करून आरोपी करण्यास कोण पुढे करत आहे याची पण चौकशी करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. माझे वडील काशिनाथ दाते हे राजकीय व सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने माझे कुटुंबीयांना वारंवार टीकेचा सामना करावा लागतो. तसेच पुराव्या विना केलेल्या आरोपाचा देखील सामना करावा लागतो. मी व माझ्या कुटुंबाने आज तगायत कधीही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही. तसेच माझ्या कुटुंबावर साधी एन.सी. देखील कोणत्याही पोलीस स्टेशनला नाही. परंतु राजकीय सुडबुद्धीने काही समाजकंटकांनी जिल्हा परिषदेची निवडणूक जवळ आलेली असल्याने माझी, माझे वडील व कुटुंबीयांची बदनामी करण्याचा दृष्ट हेतूने सदरची तक्रार माझे विरुद्ध राजकीय सूडबुद्धीने दाखल केलेली आहे. सदर तक्रारीशी माझा व माझे वडील तसेच कुटुंबीयांचा कोणताही संबंध नव्हता व नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दुध का दुध व पाणी का पाणी करावे अशी मागणी डॉ. प्रदिप दाते यांनी या निवेदनात केली आहे.
COMMENTS