पारनेर बाजार समितीची निवडणुकीतील विजयाचा जल्लोष पारनेर | नगर सह्याद्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १८ जागांवर महाविकास आघाडीने ब...
पारनेर बाजार समितीची निवडणुकीतील विजयाचा जल्लोष
पारनेर | नगर सह्याद्री
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १८ जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली असून भाजपाचे नेते सुजित झावरे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्या सौभाग्यवती राणीताई लंके यांनी फटाके फोडुन विजयोत्सव साजरा केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पोपटराव साळुंके, रवींद्र झावरे, माजी सरपंच महादु भालेकर, भास्कर नाना झावरे, उद्योजक स्वप्निल झावरे, दत्तात्रय साळुंके, दादु भालके, रावसाहेब बर्वे, सुदाम शिर्के, डॉ. बाबासाहेब गांगड, राहुल गायके, कविता गायके, सागर साळुंके, पैलवान बाळासाहेब साळुंके, गंगाधर गांगड आदी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या राणीताई लंके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित.
कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांना यश आले असून बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनेल आणि भाजपच्या जनसेवा पॅनलमध्ये सरळ लढत होऊन १८ जागांवर आघाडीने बाजी मारली. तालुयात आ. नीलेश लंके समर्थकांनी विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. आ. लंके यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांनी बाजार समिती निवडणुकीतील मुख्य विरोधक सुजित झावरे पाटील यांच्या वासुंदे गावात जाऊन फटाके फोडल्यामुळे तालुयात चर्चेचा विषय ठरला. बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या डॉ. पद्मजा श्रीकांत पठारे ९२३ व विद्यमान सभापती प्रशांत गायकवाड यांना सर्वाधिक ८१४ मते मिळाली. या निवडणुकीत भाजपच्या पॅनेलचे नेतृत्त्व खा. सुजय विखे यांच्यासह सुजित झावरे, राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष सुनील थोरात, वसंतराव चेडे, बाबासाहेब तांबे, गणेश शेळके यांनी केले होते.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी ९८ टक्के मतदान झाले होते. पारनेर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात शनिवारी मतमोजणी झाली. बाजार समिती निवडणुकीत मतदारांनी आमदार नीलेश लंके यांच्या महाविकास आघाडीला कौल दिला आहे. बाजार समितीची निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गट या महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. लंके, माजी आमदार विजयराव औटी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले यांनी केले.
COMMENTS