पारनेर | नगर सह्याद्री - पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भिमाजी तरटे तर उपसभापत...
पारनेर | नगर सह्याद्री -
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भिमाजी तरटे तर उपसभापती भाऊसाहेब उर्फ बापुसाहेब शिर्के यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सभापती पदासाठी बाबासाहेब तरटे तर उपसभापती पदासाठी बापुसाहेब शिर्के यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. दोन्ही जागेसाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक गणेश औटी यांनी या दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली.
बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गट महाविकास आघाडीचे आमदार नीलेश लंके, माजी आमदार विजय औटी, माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता आली होती. सोमवारी सभापती व उपसभापती निवडीवेळी १८ संचालका पैकी १८ संचालक उपस्थित होते. या निवडीवेळी बाजार समितीचे संचालक माजी सभापती प्रशांत गायकवाड, अशोकराव सावंत, तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, आबासाहेब खोडदे, बाबासाहेब तरटे, संदीप सालके, रामदास भोसले, किसन सुपेकर, पद्मजा श्रीकांत पठारे, मेघा श्रीरंग रोकडे, गंगाराम बेलकर, बाबासाहेब वामनराव न-हे, विजय पवार, किसनराव रासकर, भाऊसाहेब शिर्के, शंकर ताराचंद नगरे, अशोकलाल माधवलाल कटारिया, चंदन रमेश बळगट, तुकाराम दत्तू चव्हाण यांच्या सह माजी सभापती सुदाम पवार, दिपक पवार, कारभारी पोटघन, संदिप चौधरी, माजी सरपंच राहुल झावरे, सरपंच प्रकाश गाजरे, बाळासाहेब खिलारी, अरुण पवार, पोपटराव गुंड, भाऊ चौरे, शशिभाऊ आंधळे, नितीन मुरकुटे, शेरू रोकडे, जगदीश गागरे, पोपटराव गुंड, बाळासाहेब सालके, युवराज मुळे, रामदास दाते, विष्णु आंधळे, अशोक आंधळे, सिध्देश खिलारी, झुंबर उंडे, भिमा मुळे, अशोक गवळी, रामा उंडे, दत्ता घुले, अशोक पंडित, शिवाजी वाफारे, विनायक घुले, वसंतराव आंधळे, विशाल आंधळे, भाऊसाहेब आंधळे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित सभापती बाबाजी तरटे म्हणाले माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला आमदार लंके यांनी सभापती पदी संधी देवुन जो न्याय दिला आहे ते कधीच विसरणार नाही. कांदा विक्रीसाठी महाराष्ट्र राज्यमध्ये पारनेर बाजार समिती नावलौकिक आहे. तो पुढे नेण्याची जबाबदारी माझी आहे. सर्व संचालकांना बरोबर घेवून बाजार समितीचा विकास करणार असल्याचे बाबाजी तरटे यांनी सांगितले. उपसभापती भाऊसाहेब शिर्के म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील संचालकाला जी संधी सर्वानुमते देण्यात आलेली आहे. त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करतो. बाजार समितीतील व्यापारी, हमाल, मापारी ,शेतकरी, वर्गाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द त्यांनी या निवडी दरम्यान दिला.
...तर शिवसेना ठाकरे गटाला सभापतिपदाची संधी?
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीमध्ये दोन्ही पदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात पडली असून या निवडीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष ठाकरे गटाला उपसभापती पद मिळण्याची शयता व्यक्त केली जात होती. परंतु सभापती उपसभापती राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्याने भविष्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला पुढच्या निवडीवेळी सभापती पद मिळण्याची शयता व्यक्त केली जात आहे. सभापती निवडीचा निर्णय आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजयराव औटी या दोन्ही गुरु शिष्यांनी संयुक्तपणे घेतला आहे.
त्यामुळे पडली दोन्ही पदे राष्ट्रवादीच्या पारड्यात
पारनेर बाजार समितीच्या निवडीमध्ये उपसभापतिपद ठाकरे गटाला देण्याचे ठरले होते. त्यानुसार उपसभापतिपदासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांचे नाव आघाडीवर होते. परंतु, उपसभापतिपद नको, सभापती पद द्या अशी गळ संचालक भोसले यांनी श्रेष्ठींना घातली. तसेच उपसभापतिपद ठाकरे गटाच्या महिला सचालकांना देण्यात यावे असे त्यांनी सांगितले. परंतु, ठाकरे गटाच्या महिला संचालकांनीही उपसभापतिपद घेण्यास नकार दिला. त्यामुळे सभापतिपदासह उपसभापतिपदही राष्ट्रवादीच्या पारड्यात पडले.
COMMENTS