मुंबई । नगर सह्याद्री - राज्यात अनेक दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे. आता तसेच राज्यांमध्ये मान्सूनची चाहूल लागली आहे. राजस्थान, मध्य प्...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्यात अनेक दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे. आता तसेच राज्यांमध्ये मान्सूनची चाहूल लागली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, पश्चिम हिमालयीन प्रदेश, वायव्येकडील मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये 3 मेपर्यंत हवामान असेच राहील. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, यात 4 मेपासून बदल होईल.
गेल्या 24 तासांत या राज्यांतील अनेक भागात थंडी वाढली आहे. मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये रविवारी दुपारी 2.30 वाजता किमान तापमान 18.6 अंशांवर गेले. राजस्थानमध्येही अशीच परिस्थिती आहे. 9 शहरांचे तापमान 30 अंशांच्या खाली राहिले आहे. जयपूर, सीकर, नागौर, अलवर, बारन, बिकानेरसह राज्यातील बहुतांश भागात पाऊस आणि गारा पडल्या. दिल्ली, पंजाब, बिहार, यूपीमध्येही तापमानात 3 ते 5 अंशांनी घट झाली आहे.
या 11 शहरांत पुढील 2 दिवस किमान तापमान 20 किंवा त्यापेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्यानुसार, डेहराडून, पुणे, दिल्ली, भोपाळ, जबलपूर, कोहिमा, भीलवाडा, जालंधर, बरेली, गया आणि हरदोई येथे 2 आणि 3 मे रोजी किमान तापमान 20 किंवा त्याहून कमी राहण्याची शक्यता आहे.
वारा खंडितता प्रणालीमुळे राज्यात अवकाळी पाऊस सुरू असून सोमवार, 1 मे रोजी विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
राज्यात गत तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी आहे. रविवारी राज्यात महाबळेश्वर येथे कमाल 28 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 20 किलोमीटर असल्याने सरासरी कमाल तापमानही पाच ते सहा अंश सेल्सियसने घसरले आहे.
COMMENTS