अहमदनगर | नगर सह्याद्री - नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल मापाडी यांचे राज्यव्यापी अधिवेशन नगर शहरात आयोजित केले आहेत. त्यामुळे...
अहमदनगर | नगर सह्याद्री -
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल मापाडी यांचे राज्यव्यापी अधिवेशन नगर शहरात आयोजित केले आहेत. त्यामुळे नगरचे भुसार, भाजीपाला, कांदा मार्केट शनिवार (दि.२०) ते सोमवार (दि.२२) असे ३ दिवस बंद राहणार असून मंगळवार (दि.२३) पासून मार्केट पूर्ववत सुरु होणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.
नगर बाजार समितीतील भाजीपाला विभागात हमाल मापाडी यांचे राज्यव्यापी अधिवेशन अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने रविवारी (दि.२१) आहे. हमाल मापाडी अधिवेशनात येथील कामगार सहभागी होणार आहेत. त्यामुळे शनिवारी (दि. २०) व सोमवारी (दि. २२) उपबाजार आवार नेप्ती येथील कांदा लिलाव बंद राहणार आहेत. तसेच शनिवार आणि रविवारी भुसार,भाजीपाला विभागातील सर्व कामकाज बंद राहणार आहेत. या बंद कालावधीमध्ये शेतकरी बांधवांनी शेतमाल यार्डवर विक्रीस आणू नये. मंगळवारपासून (दि. २३) समितीचे भुसार, भाजीपाला विभागातील कामकाज नियमित सुरु होईल. उपबाजार आवार नेप्ती येथील कांदा लिलाव गुरुवार (दि. २५) नियमित सुरू राहतील, याची शेतकर्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासक देवीदास घोडेचोर यांनी केले आहे.
COMMENTS