म्हणून एका मुलाने मोबाईल चोरण्यास सुरुवात केली. आतापर्यंत अनेक महागडे मोबाईल १०००, ५०० रुपयांना विक्री करून नशा भागवली.
मुंबई / नगर सह्याद्री -
नशा काय करायला लावेल हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार बीडमध्येही घडला आहे. नशा करण्यासाठीसा पैसे नाही, जगण्यासाठी मजूर म्हणून काम करायचे जीवावर यायचे. म्हणून एका मुलाने मोबाईल चोरण्यास सुरुवात केली. आतापर्यंत अनेक महागडे मोबाईल १०००, ५०० रुपयांना विक्री करून नशा भागवली. मात्र अखेर तो पोलिसांच्या निदर्शनास आला आणि स्थानिक गुन्हे शाखेने मद्यधुंद चोरट्याला १७ महागड्या मोबाईलसह जेरबंद करण्यात आले .
सोहिल खान समद खान (रा. जुना भाजी मार्केट, बुंदेलपुरा, बीड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. सोहिल हा दारूच्या आहारी गेलेला आहे. त्याला रोज दारू प्यायला लागते. दिवसभर काम करून नशा करणे त्याच्या स्वभावात नव्हते. सोप्या मार्गाने पैसे गोळा करून नशा करणे हे त्याचा नित्यनियम झाला होता. दारू घेण्यासाठी पैसे नसल्याने त्याने मोबाईल चोरला सुरवात केली.
बीड शहरात मोबाईल चोरीच्या घटना वाढत असताना एलसीबीला सोहिलची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून सोहिलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १७ मोबाईल जप्त करण्यात आले असून ते शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
COMMENTS