अंदमान निकोबारच्या नानकोवरी बेटावर धडकला नवी दिल्ली | वृत्तसंस्था नैऋत्य मोसमी पावसाने शुक्रवारी अंदमान-निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर...
अंदमान निकोबारच्या नानकोवरी बेटावर धडकला
नवी दिल्ली | वृत्तसंस्था
नैऋत्य मोसमी पावसाने शुक्रवारी अंदमान-निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर हजेरी लावली आहे. येथे मोसमी वार्यासह पाऊस सुरू झाला. वास्तविक पोर्ट ब्लेयर येथे मान्सून धडकण्याची तारीख २१ मे असते. नानकोवरी बेट पोर्ट ब्लेयरपासून ४२५ किमी दक्षिण दिशेला व अखेरचे बेट इंदिरा पॉइंटपासून १३६ किमी उत्तरेला आहे.
बंगालच्या खाडीत अंदमान-निकोबार बेटाच्या दक्षिणेकडील भागात मोसमी पाऊस नेहमीच्या तारखेवर पोहोचला आहे. तूर्त तो किमान दोन दिवस मंदगतीने मार्गक्रमण करेल, अशी परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. परंतु दीर्घकालीन विचार केल्यास अल-निनो परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोसमी पावसात हा अडथळा ठरू शकतो. त्यामुळे जून ते सप्टेंबर असे चार महिने भारतीय मान्सूनसाठी प्रतिकूल ठरतात. मान्सून सध्या तरी पोर्ट ब्लेयरपर्यंत पोहोचलेला नाही. केरळच्या किनारपट्टी भागात मान्सून धडकण्यासाठी यंदा तीन दिवसांचा विलंब लागेल.
COMMENTS