हवामान विभागाची माहिती | मान्सून हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज पुणे | नगर सह्याद्री मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात मोठी...
हवामान विभागाची माहिती | मान्सून हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज
पुणे | नगर सह्याद्री
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेराज्यात मान्सून सुरू होण्याची शेतकर्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकही आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, पॅसिफिक महासागरात एल निनो ची चिन्हे असतानाही भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी या वर्षीच्या जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनच्या हंगामातील सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला.
मान्सूनच्या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शयता आहे. मध्य भारतात सरासरी पाऊस अपेक्षित असला तरी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शयता आहे. जून महिन्यातही राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शयता आहे. त्यामुळं बळीराजाने एखाद्या पावसामुळे पेरणीसाठी धावपळ करू नये, अशी सूचनाही करण्यात आली.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, तर उत्तर कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शयता आहे. मध्य भारतातही काही ठिकाणी कमी पाऊस पडण्याची शयता आहे. त्याची संभाव्यता ५५ टक्के असल्याचे सांगण्यात आले. सांगली जिल्ह्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शयता आहे. सध्याच्या अंदाजानुसार सांगली वगळता इतर जिल्ह्यांना यंदाच्या पावसात फारसा दिलासा मिळण्याची शयता कमी आहे. सह्याद्रीच्या पूर्वेला, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची ३५ टक्के शयता आहे.
जूनमध्ये कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शयता आहे, असा अंदाज आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी किनारपट्टीवर जाणवण्याची शयता आहे, मात्र मान्सूनचा पाऊस कमी होऊ शकतो. कोकणाबरोबरच मुंबईतही जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शयता आहे. हवामान खात्याचे सेवानिवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी येत्या मंगळवार ते शुक्रवार असे चार दिवस संपूर्ण कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका अवकाळी पाऊस पडण्याची शयता वर्तवली आहे.
या वर्षी मान्सूनचा पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या ९६ टक्के (त्रुटी उणे ४ टक्के) होण्याची शयता आहे. १९७१ ते २०२० या कालावधीसाठी मान्सूनच्या पावसाची राष्ट्रीय सरासरी ८७० मिमी आहे. या वर्षी वायव्य भारतात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल (दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या ९२ टक्क्यांपेक्षा कमी). ईशान्य, मध्य आणि दक्षिण भारतात हंगामी पावसाचे प्रमाण सामान्य असेल (सरासरीच्या ९६ ते १०६ टक्के) असे आयएमडी च्या न्यूमेरिकल वेदर प्रेडिशन विभागाचे प्रमुख डी. एस. पै यांनी शुक्रवारी सांगितले. मान्सून कोर झोन म्हणून ओळखल्या जाणार्या ओडिशा ते राजस्थानपर्यंतच्या मध्य भारतातील खरिपाच्या प्रदेशात यावर्षी सामान्य पाऊस पडण्याची शयता आहे, असं ते म्हणाले.
या पावसाळ्यात पॅसिफिक महासागराचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची असून मान्सून हंगामात एल निनो विकसित होण्याची शयता ९० टक्क्यांवर पोहोचली आहे.
COMMENTS