रिजिजू यांनी म्हटले आहे की, "पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री म्हणून काम करणे हा माझ्यासाठी एक सन्मान आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
मोदी सरकारमध्ये विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावण्यात आले आहे. या मंत्रालयाची जबाबदारी आता अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्री परिषदेच्या सदस्यांना पुन्हा खात्यांचे वाटप केले आहे.
किरेन रिजिजू यांच्याकडे आता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे मंत्रालय सांभाळत होते. त्याचबरोबर मेघवाल यांच्याकडे कायदा राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. मेघवाल यांच्याकडे यापूर्वीच सांस्कृतिक मंत्रालय आणि संसदीय कामकाज मंत्रालयात राज्यमंत्री पद आहे.
दरम्यान, रिजिजू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री म्हणून काम करणे हा माझ्यासाठी एक विशेषाधिकार आणि सन्मान आहे. मी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि कनिष्ठ न्यायपालिका आणि आपल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कायदेशीर सेवा प्रदान करण्यासाठी सर्व कायदा अधिकारी यांचे अभिनंदन करू इच्छितो. प्रचंड पाठिंब्याबद्दल धन्यवाद."
रिजिजू पुढे म्हणाले, "मी एक नम्र कार्यकर्ता म्हणून ज्या आवेशाने आणि उत्साहाने आत्मसात केले आहे त्याच आवेशाने आणि उत्साहाने पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भूविज्ञान मंत्रालयात काम करण्यास उत्सुक आहे."
COMMENTS