घटनास्थळी पिस्तुलाचे मॅगझिन व गोळ्याचा भाग सापडला असून यशवंतराव बागूल असे मृत तरुणाचे नाव आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
धुळे पुन्हा एकदा हत्याकांडाने हादरले आहे. तालुक्यातील नेर गावाजवळील उभंड-पिंपरखेड येथे एका व्यक्तीचा पिस्तुलाने गोळ्या घालून व चाकूने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली
धुळ्यातील या घटनेने खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पिस्तुलाचे मॅगझिन व गोळ्याचा भाग सापडला असून यशवंतराव बागूल असे मृत तरुणाचे नाव आहे.
धुळे तालुका पोलीस तपास पथकासह रात्रीच घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस प्रशासन रात्री उशिरापर्यंत घटनेचा तपास करत होते. या हल्ल्यात ४ ते ५ जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. घटनास्थळाचा पंचनामा, नमुने घेण्यासह रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती, जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
COMMENTS