मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मान्य केला पराभव बंगळूर | वृत्तसंस्था - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत १३५ जागांवर विजयी होत काँग्रे...
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मान्य केला पराभव
बंगळूर | वृत्तसंस्था -
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत १३५ जागांवर विजयी होत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजप ६६, जेडीएस २० आणि इतर ४ जागांवर निवडून आले आहेत. काँग्रेसला 42.8%, भाजपाला 36.1% आणि जेडीएसला 13.2% मते माळी आहेत. काँग्रेसच्या या विजयानंतर देशभरात काँग्रेस समर्थकांनी जल्लोष साजरा केला. काँग्रेसमध्ये सत्ता दिसताच मुख्यमंत्री पदावरून रस्सिखेच सुरू झाली आहे.
राहुल गांधींनी मानले मतदारांचे आभार; म्हणाले...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर दुपारी 2.30 वा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते पत्रकारांना 6 वेळा नमस्कार करत कर्नाटकातील द्वेषाचा बाजार उठून प्रेमाचा बाजार भरल्याचे स्पष्ट केले. 'कर्नाटकने देशाला प्रेम पसंत असल्याचे दाखवून दिले,' असे ते म्हणाले. राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले - 'सर्वप्रथम मी कर्नाटकच्या जनतेला, तथा या निवडणुकीत अपार कष्ट उपसणाऱ्या तेथील कार्यकर्त्यांना व नेत्यांचे अभिनंदन करतो. कर्नाटकच्या निवडणुकीत एकीकडे धनदांडग्या भांडवलदारांची ताकद होती. तर दुसरीकडे गरीबांची शक्ती होती. शक्तीने ताकदीचा पराभव केला. यापुढे हेच संपूर्ण देशात घडेल. काँग्रेस या निवडणुकीत गरीबांच्या बाजूने उभी होती. हा सर्वांचा विजय आहे. हा कर्नाटकच्या विजयाचा विजय आहे. मतदारांचे मनस्वी आभार.'
या निवडणुकीत काँग्रेसला ४२.८%, भाजपाला ३६.१% आणि जेडीएसला १३.२% मते मिळाली आहेत. ट्रेंड लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूला पोहोचण्यास सांगितले आहे. कर्नाटकात कोणाचे सरकार स्थापन होणार, हे ट्रेंडवरून स्पष्ट झालेले नाही. एझिट पोलबद्दल बोलायचे झाले तर १० पैकी ५ जणांनी त्रिशंकू विधानसभा होण्याची शयता वर्तवली आहे. चारमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष घोषित करण्यात आला असून एकामध्ये भाजपला आघाडी मिळाली आहे.
दुसरीकडे विक्रमी मतदान होऊनही त्याच्या पॅटर्नवरून काहीही स्पष्ट होत नाही. काँग्रेस, भाजप, जेडीएस आपापल्या विजयाचा दावा सुरूवातीला करत होते. राज्यात आतापर्यंत १४ विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. ८ निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली, ज्यामध्ये १९६२ मध्ये काँग्रेस फक्त एकदाच सत्तेवर आली. त्याच वेळी, पाच निवडणुकांमध्ये मतांची टक्केवारी कमी राहिली, ज्यामध्ये भाजप एकदाच सत्तेत परतला. राज्यात ३८ वर्षांपासून सत्तेची पुनरावृत्ती झालेली नाही. शेवटच्या वेळी रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाने १९८५ मध्ये सत्तेत असताना निवडणूक जिंकली होती. त्याच वेळी, गेल्या पाच निवडणुकांपैकी (१९९९, २००४, २००८, २०१३ आणि २०१८) एकाच पक्षाला केवळ दोनदा (१९९९, २०१३) बहुमत मिळाले. २००४, २००८, २०१८ मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. बाहेरच्या पाठिंब्यावर त्यांनी सरकार स्थापन केले.
१० मे रोजी २२४ जागांसाठी ५.१३ कोटी मतदारांनी २,६१५ उमेदवारांना मतदान केले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमध्ये ७३.१९ टक्के मतदान झाले आहे. १९५७ नंतर राज्याच्या निवडणूक इतिहासातील हा उच्चांक आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमधील अनेक बड्या चेहर्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले होते. काँग्रेसचे सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार, भाजपचे बसवराज बोम्मई हे प्रमुख चेहरे आहेत. त्याचवेळी भाजप आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह येडियुरप्पा यांच्यासाठीही ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. काँग्रेस अध्यक्ष म्हणून खरगे यांची कसोटी आहे. त्यांनी काँग्रेसचे सरकार स्थापन केले तर पक्षातील त्यांचा दर्जा वाढेल. त्याचवेळी भाजपने पंतप्रधान मोदींनंतर येडियुरप्पा यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला आहे.
बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती मोठा धक्का
कर्नाटक निवडणुकीत बेळगामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा धक्का बसला आहे. समितीला सर्वच जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी 11 मतदारसंघांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला असून 7 जागांवर भाजपची सरशी झाली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुरलीधर पाटील (खानापूर), रमाकांत कोंडूसकर (बेळगाव दक्षिण), अमर येळ्ळूरकर (बेळगाव उत्तर) आणि आर. एम. चौगुले यांना बेळगाव ग्रामीणमधून पराभव स्वीकारावा लागला आहे.
उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू आहे. सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला धोबीपछाड दिला आहे. निवडणूक निकाल कर्नाटकाचा असला तरी, रण मात्र महाराष्ट्रात पेटलं आहे. विरोधी पक्षांचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. त्याचवेळी मुंबईत 'मातोश्री'वर ठाकरे गटाच्या झालेल्या बैठकीतही कर्नाटक निवडणूक निकालावर चर्चा झाली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर विस्तृत चर्चा झाली असली तरी, कर्नाटकाच्या निकालाचा मुद्दाही चर्चिला गेला.
मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच...
बहुमत मिळत असल्याचे निदर्शनास येताच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली. माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि डी के शिवकुमार यांच्यात ही स्पर्धा आहे. शिवकुमार यांनी जाहीरपणे आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे अगोदर म्हटले होते. असे असले तरी सिद्धरमय्या यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यांचे चिरंजीव यतिंद्र यांनीही माझ्या वडिलांनी मुख्यमंत्री व्हावे, असे सांगत डी के शिवकुमार गटाला हादरा दिला आहे.
शरद पवारांची पुढची रणनीती तयार? म्हणाले, मी स्वत:…
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला असून त्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं आता स्पष्ट होऊ लागलं आहे. भाजपाच्या डावपेचांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील आणि विविध राज्यांमधलेही भाजपाचे अनेक दिग्गज नेते कर्नाटकात प्रचाराला आले होते. मात्र, यानंतरही भाजपाचा पराभव झाल्यामुळे विरोधी पक्षांचा उत्साह वाढल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक निवडणूक निकालांचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले असून शरद पवारांनी त्यासंदर्भातले संकेत दिले आहेत.
शरद पवारांना फोडाफोडीच्या राजकारणाचा संशय
दरम्यान, शरद पवारांनी कर्नाटकमध्येही फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता व्यक्त केली आहे. “फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता नाकारता येत नाही. पण कर्नाटकच्या जनतेनंच असा निकाल दिलाय. फोडाफोडीला संधी मिळणार नाही याची खबरदारी जनतेनंच घेतली आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत. कर्नाटक निवडणूक निकालांनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
“मोदी है तो मुमकिन है लोकांना अमान्य”
‘मोदी है तो मुमकिन है’ याला लोकांनी नाकारल्याचं शरद पवार म्हणाले. “मोदी है तो मुमकिन है असं याआधीच बोलायला भाजपाच्या लोकांनी सुरुवात केली होती. हळूहळू एका व्यक्तीच्या हातात सगळी सूत्रं या गोष्टीला लोकांचा पाठिंबा नाही हे आता दिसायला लागलंय”, असं शरद पवार म्हणाले.
लवकरच मविआची बैठक होणार!
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती दिली. “महाराष्ट्रात आम्ही आमच्या पक्षाची बैठक दोन दिवसांनी बोलवली आहे. मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र बसून पुढची आखणी आत्तापासूनच करावी हा माझा विचार आहे. त्यानुसार मी इतर दोघांशी बोलणार आहे. त्यानुसार या मार्गाने जायचा निर्णय आम्ही घेणार आहोत”, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
“तिन्ही पक्ष एकत्र लढले, तर बदल शक्य आहे”
“मी महाराष्ट्रात हल्लीच काही ठिकाणी गेलो. सोलापूर, सांगोला, कागल, साताऱ्याला गेलो. या सगळ्या भागात मागच्या निवडणुकीच्या वेळी मी जसा प्रचाराला बाहेर पडलो आणि माझी ती पावसातली सभा वगैरेला जो प्रचंड प्रतिसाद होता, तेच चित्र गेल्या आठवड्यात मी ज्या सहा ठिकाणी गेलो, तिथे दिसलं. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की लोकांना इथेही बदल हवाय. ते पुढच्या निवडणुकीत दिसेल. आम्ही तिघं एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर ते घडताना दिसतंय. आम्हाला ठाऊक आहे की कोणतं धोरण योग्य राहील. आम्हाला असं वाटतं की तिघांनी एकत्र यावं. त्याबरोबरच छोट्या पक्षांनाही विश्वासात घ्यावं. पण बाकीच्या सहकाऱ्यांशी बोलूनच त्याचा निर्णय घेतला जाईल”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
एकीकरण समितीचा पराभव का झाला?
शरद पवारांनी सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव का झाला? याचं कारण पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. “समितीला अपयश आलं ही गोष्ट मान्य करायलाच हवी. आम्ही समितीच्या विरोधात कुठेही उमेदवार उभा केला नाही. आम्ही कुठेही प्रचाराला गेलो नाही. कारण समितीला महाराष्ट्रानं विश्वास दिला होता. पण यावेळी एकीकरण समिती आणि अन्य पक्षांमध्ये एकवाक्यता राहिली नाही. याचा परिणाम म्हणून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
COMMENTS