ज्युनियर एनटीआरच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा २० वर्षे जुना चित्रपट 'सिम्हाद्री' पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
दाक्षिणात्य अभिनेते ज्युनियर एनटीआरच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा २० वर्षे जुना चित्रपट 'सिम्हाद्री' पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रिलीज झाल्यामुळे आनंदी झालेल्या चाहत्यांनी सिनेमा हॉलमध्ये गर्दी केली होती, परिणामी ज्युनियर एनटीआर चाहत्यांनी चित्रपट पाहत असताना सिनेमा हॉलला आग लावली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सिम्हाद्री' पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी थिएटरमध्ये जोरदार गर्दी केली होती आणि ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाचा आनंद लुटला होता. उत्साही चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडण्यास सुरुवात केली. फटाके फोडल्यानंतर काही वेळातच सिनेमा हॉलमध्ये आग लागली आणि या दुर्घटनेत हॉलमधील काही सीटचे नुकसान झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ज्युनियर एनटीआरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ते 'देवरा' चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाशी संबंधित त्यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्यासोबत जान्हवी कपूरही दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री तेलुगू चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे.
Seats thagalettaru entra 🤣🤣🤣
— Mahesh Babu (@MMB_tarakian) May 20, 2023
Vijayawada Apsara Theatre 6:15 show #HappyBirthdayJrNTR pic.twitter.com/flUe0JtAX4
COMMENTS