भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बुधवारपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पक्षाने ही माहिती दिली.
मुंबई / नगर सह्याद्री -
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बुधवारपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पक्षाने ही माहिती दिली. येत्या निवडणुकीची तयारी लक्षात घेऊन ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थींच्या बैठकीसह मुंबईतील काही कार्यक्रमांमध्ये नड्डा सहभागी होणार आहेत. तसेच उद्या, ते पुण्यात पक्षाच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीला संबोधित करणार आहेत.
आगामी निवडणुकीची तयारी लक्षात घेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा महाराष्ट्र दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जेपी नड्डा आज सकाळी ११ वाजता मुंबईत पोहोचतील. येथे पोहोचल्यानंतर सायन, चेंबूर, कांदिवली, बोरिवली आदी ठिकाणी आयोजित सर्व कार्यक्रमात ते सहभागी होतील.
मुंबईत आयोजित सर्व कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर जेपी नड्डा पुण्याला रवाना होतील. येथे ते प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप करतील. बैठक संपल्यानंतर आमदार-खासदारांची बैठकही आयोजित केली जाणार आहे. आयोजन करण्यात आलेल्या बैठकीनंतर ते मंत्र्यांचीही स्वतंत्र बैठक घेणार आहेत. सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर नड्डा श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातील.
COMMENTS