जालना । नगर सहयाद्री - जालन्यामधून एक संतापजनक बातमी समोर अली आहे.आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना घडली आहे. एका वृद्ध आईवर पोटच्...
जालन्यामधून एक संतापजनक बातमी समोर अली आहे.आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना घडली आहे. एका वृद्ध आईवर पोटच्या पोराने लाकडी दांड्याने मारहाण करीत एकाच रात्रीत तीन ते चार वेळा बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जन्मदात्या आईवरच नराधम मुलाने सलग ३ते ४ वेळा बलात्कार केल्याच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, पारेगावातील ६५ वर्षीय वृद्ध महिला आपल्या वृद्ध अपंग पतीसोबत वास्तव्यास आहे. वृद्ध महिलेचा पती एका पायाने अपंग असल्यामुळे भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात त्यांना एक २७ वर्षीय राहुल गौतम गायकवाड नावाचा एक मुलगा देखील आहे. राहुल हा अविवाहित असून, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात सालगाडी म्हणून तो कामाला आहे.
दहा बारा दिवसापासून राहुल गायकवाड हा सुट्टी घेऊन जालना तालुक्यातील पारेगाव आला होता. आपला मुलगा खूप दिवसांनी गावी आल्याने आईने त्या दिवशी रात्री त्याच्यासाठी गोड जेवण बनवले. जेवण झाल्यानंतर वृद्धा महिला आणि नराधम मुलगा घराच्या अंगणात झोपले होते. राहुल याने रात्री १२ वाजळल्याच्या सुमारास वडील भिक्षेसाठी जालना येथे गेल्याने, ते परत आले नसल्याची संधी साधतं आपल्या पायाला काहीतरी चावले आहे, घरात चल लाईटच्या उजेडात पाहा असे सागतं आईला घरात घेऊन जाऊन आईवर अत्याचार केला.
COMMENTS