शेतात नांगरणी करताना जुने सोने सापडले असे सांगून निम्म्या बाजारभावाने सोने विकण्याच्या बहाण्याने फसवणूक केली जात होती.
मुंबई / नगर सह्याद्री -
शेतात नांगरणी करताना जुने सोने सापडले असे सांगून निम्म्या बाजारभावाने सोने विकण्याच्या बहाण्याने फसवणूक केली जात होती. या टोळीला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.
शेत नांगरताना जुने सोने सापडले असे सांगून ढोंग करत होते. ही टोळी रायगड शहर व परिसरात सक्रीय झाली होती. शिवाजी मोहिते (वय ५१, रा. नांदेड), वशिकला पवार (वय ६५, रा. उस्मानाबाद) आणि अनिता भोसले (वय ४०, रा. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १३,३०,००० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
नागोठणे पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
COMMENTS