चेन्नईतील लायका प्रॉडक्शनच्या परिसरात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून झडती घेण्यात येत आहेत.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
चेन्नईतील लायका प्रॉडक्शनच्या परिसरात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून झडती घेण्यात येत आहेत. या कंपनीच्या बॅनरखाली 'पोन्नियिन सेल्वन १' आणि 'पोनियिन सेल्वन-२' या प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय अन्वेषण एजन्सीने प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवल्यानंतर चेन्नईतील सुमारे आठ परिसरांची झडती सुरू आहे.
लायका प्रॉडक्शनने तमिळ चित्रपटांची निर्मिती केली आहे ज्यात काथ्थी, एनाक्कू इनोरु पर इरुक्कू, प्रिझनर नंबर १५०, यमन, इप्पडाई वेल्लम, दिया, कोल्लामावू कोकिला, चेक्का चिवंथा वनम, वडा चेन्नई यासह इतरांचा समावेश आहे. लायका प्रॉडक्शनने २.० ची निर्मिती केली, जो रिलीजच्या वेळी सर्वात महागडा भारतीय चित्रपट होता. हा चित्रपट ४०० ते ६०० कोटी रुपयांच्या अंदाजे बजेटमध्ये बनवण्यात आला होता. रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
लायका कंपनीकडे कमल हसन स्टारर 'इंडियन २' आणि रजनीकांतचा 'लाल सलाम' यासह हाय प्रोफाईल चित्रपट देखील रिलीजसाठी आहेत. लायका प्रॉडक्शनने गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'राम सेतू' या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाची निर्मितीही केली होती, मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही.
COMMENTS