मालव राजदाने जेनिफरच्या वागण्याबद्दल सांगितले की, 'मी तिच्यासोबत १४ वर्षे सेटवर काम केले आहे. ती सेटवरील सर्वात आनंदी लोकांपैकी एक आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कौटुंबिक शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हे घराघरात पोहोचले आहे. पण रोशन कौर सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने याला निरोप दिल्यापासून ती वादात सापडली आहे. त्याचवेळी, शोमधून बाहेर पडताच जेनिफरने निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. आता या प्रकरणी शोचे माजी दिग्दर्शक मालव राजदा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मीडियाशी बोलताना मालव राजदाने जेनिफरच्या वागण्याबद्दल सांगितले की, 'मी तिच्यासोबत १४ वर्षे सेटवर काम केले आहे. ती सेटवरील सर्वात आनंदी लोकांपैकी एक आहे. तीच वागणं सगळ्यांसोबत खूप चांगले असते, मग ती टेक्निकल टीम असो, डायरेक्शन टीम असो, डीओपी असो, हेअर-मेकअप असो किंवा को-स्टार्स असो, सेटवर सगळ्यांशी तीच चांगले नाते होते. सेटवर तिने माझ्यासमोर कधीही कोणाशीही गैरवर्तन केले नाही किंवा शिवीगाळ केली नाही.
जेनिफरला सेटवर उशीर झाल्याच्या दाव्यावरही मालव राजदा म्हणाले की, जितका दावा केला जात आहे की ती सेटवर उशिरा यायची, मी सांगू इच्छितो की गेल्या १४ वर्षात माझ्या समोर असे कधीच घडले नाही की जेनिफरमुळे माझ्या शूटला त्रास सहन करावा लागला. शोचे इतर अनेक कलाकार शूटिंगला उशिरा पोहोचायचे. मुंबईच्या ट्रॅफिकबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. असित मोदी म्हणाले होते की, जेनिफर सेटवर उशिरा यायची, त्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला.
जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांनी प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच निर्माता असित मोदीवर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले आहे. शोचे निर्माते असित मोदींबाबत जेनिफर म्हणाली, 'असित मोदीचे माझ्यासोबत यापूर्वी अनेकदा शारीरिक संबंध होते. सुरुवातीला मी नोकरी जाण्याच्या भीतीने त्यांच्या सर्व विधानांकडे दुर्लक्ष केले. पण पुरे झाले आणि मी यापुढे घेणार नाही.'
COMMENTS