पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी दीराला अटक केली.
मुंबई / नगर सह्याद्री -
सोनगीर (जि. धुळे) येथील एका ३७ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्यानंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना धुळ्यातील कृषी महाविद्यालय परिसरात घडली. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी दीराला अटक केली.
सोनगीर (धुळे) येथील एका ३७ वर्षीय महिलेने आझादनगर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, दीर बाळू यादवचंद्र (रा. गुरुकृपा कॉलनी, चित्तोड रोड, धुळे) याने तिला कृषी महाविद्यालय परिसरात बोलावून घेतले. सोमवारी (22 मे) दुपारी मध्यरात्रीनंतर दीड ते दोनच्या सुमारास आरोपी बाळूने तिला बोलावून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. यानंतर तिला बांधून ठेवले. तेथे त्याच्या गाडीतुन पेट्रोल काढून त्याच्या अंगावर ओतून पेटवून दिले. या घटनेनंतर तो फरार झाला.
पेट घेतल्याने पीडितेने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. सकाळीच कृषी महाविद्यालयाच्या चौकीदाराला याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील, संदीप पाटील पथकासह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्याने रुग्णवाहिका बोलावली. मात्र, रुग्णवाहिका न आल्याने आझादनगर पोलिसांनी पीडितेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्या जबानीनुसार संशयित बाळू चंद्राविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
COMMENTS