देशाची राजधानी दिल्लीतील आणखी एका शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. धमकीच्या ई-मेलनंतर दिल्ली पोलीस आणि इतर पथके घटनास्थळी पोहोचली.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
देशाची राजधानी दिल्लीतील आणखी एका शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. धमकीच्या ई-मेलनंतर दिल्ली पोलीस आणि इतर पथके घटनास्थळी पोहोचली. आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली जात आहे. यापूर्वीही अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमक्या मिळाल्या आहेत.
मंगळवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास दिल्लीतील साकेतच्या पुष्पा विहार येथील अमृता पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. बॉम्बची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. माहिती मिळताच पोलीस आणि इतर पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
दिल्ली दक्षिण जिल्ह्याचे डीसीपी चंदन चौधरी यांनी सांगितले की, धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर शाळेची चौकशी सुरू करण्यात आली. सर्व ठिकाणांची कसून चौकशी केली. झडतीदरम्यान पोलिसांना काही संशयास्पद आढळून आले नाही. हा मेल कुठून आणि कोणाकडून आला याचा तपास सुरू आहे.
यापूर्वी डिफेन्स कॉलनी आणि डीपीएस मथुरा रोड येथील इंडियन पब्लिक स्कूलला बॉम्बची धमकी मिळाली होती. २६ एप्रिल रोजी मथुरा रोडवरील दिल्ली पब्लिक स्कूललाही ईमेलद्वारे धमकी देण्यात आली होती. शाळा प्रशासनाने सकाळी ८.१० वाजता नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
यापूर्वी १२ एप्रिल रोजी दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनी पोलिस स्टेशन हद्दीतील सादिक नगर येथील शाळेत बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर फक्त गोंधळ उडाला होता. शाळा प्रशासनाने पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज पाठवून मुलांना येऊन पाल्यांना घेऊन जावे, असे सांगण्यात आले होते. हा मेसेज मिळताच पालक शाळेत मोठी गर्दी झाली होती.
COMMENTS