कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) दीपक पाटील यांनी तरुणांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
कोल्हापूर जिल्ह्यात बेफाम गाडीचालवणाऱ्या चालकावर कारवाई सुरू आहे. त्यामुळे वारंवार अपघात होत असून जीवितहानी होत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) दीपक पाटील यांनी तरुणांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून (२२ मे) दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच वाहने चालवावीत, असे आवाहन दीपक पाटील यांनी केले आहे.
सुरुवातीचे आठ दिवस हेल्मेट न घालता वाहन चालविणाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता हेल्मेट घालण्याचे फायदे समजावून सांगितले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेटबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्यांकडून १००० रुपये दंड वसूल केला जाईल.
विशेष म्हणजे ज्या संस्था, कार्यालय, कंपनी या गाडी चालवतात त्या कंपनीच्या मालकाला १००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात (कोल्हापूर) शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी याची अंमलबजावणी करावी यासाठी यंत्रणेचे लक्ष राहणार असल्याचे पाटील यांनी नमदू केले.
COMMENTS