धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या चौसाळा बायपासजवळ कार-बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाईक चालवणारे दोघे गंभीर जखमी झाले.
मुंबई / नगर सह्याद्री -
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या चौसाळा बायपासजवळ कार-बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाईक चालवणारे दोघे गंभीर जखमी झाले.
बीड येथील चौसाळा गावाजवळ मंगळवारी रात्री हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, बाईक चालवणारे दोघे वीस फूटांवर जाऊन पडले. यामध्ये बाईकमधील दोन्ही गंभीर जखमी झाले असून कारचालक देखील जखमी झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, या अपघातात अमोल बोडके (वय ३० वर्षे रा. बनगरवाडी जि. वाशी, जि. धाराशिव) व ऍड. अजित भैरट (वय ४२ वर्षे रा. इजोरा ,ता. वाशी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. दरम्यान, तिन्ही जखमींवर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
COMMENTS