मुंबई। नगर सहयाद्री मुंबई पोलिस भरती लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याच वृत्त समोर आले आहे. उमेदवारांनी बटण कॅमेऱ्याच्या साहा...
मुंबई पोलिस भरती लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याच वृत्त समोर आले आहे. उमेदवारांनी बटण कॅमेऱ्याच्या साहाय्याने प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून ते ई-मेलद्वारे बाहेर पाठवले आणि बाहेर असलेल्या शिक्षकांनी त्यांना उत्तरे मायक्रो ब्ल्यूटूथद्वारे सांगितले. शेकडो जणांनी या प्रकारे परीक्षा दिली असल्याचे समोर आले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, मुंबई पोलिस दलात रिक्त ७ हजार ७८ जागांसाठी ७ मे रोजी लेखी परीक्षा पार पडली. एकूण २१३ केंद्रांवरून ७८,५२२ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. दरम्यान, भरती प्रक्रियेत हायटेक पद्धतीचा वापर करून गैरप्रकार केला जाणार असल्याची कुणकुण स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला लागली होती. समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी ५ मे रोजीच याबाबत मुंबई पोलिसांना माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत कॉपी करताना आढळून आले आहे.
मुंबई पोलिस भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी बटण कॅमेऱ्याच्या साहाय्याने प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून ते ई-मेलद्वारे बाहेर पाठवले आणि बाहेर असलेल्या शिक्षकांनी त्यांना उत्तरे मायक्रो ब्ल्यूटूथद्वारे सांगितले. शेकडो जणांनी या प्रकारे परीक्षा दिली. एका उमेदवाराकडून १० लाख रुपये घेण्यात आल्याचा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केला आहे.
या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे, गोरेगाव पोलिस ठाणे, मेघवाडी पोलिस ठाणे आणि भांडूप पेालिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवले असून कवठेकर यांनी तब्बल १६ प्रकारचे प्रश्नपत्रिकांचे फोटो मुंबई पोलिसांना पुरावा म्हणून दिले आहेत. भांडूप पोलिसांनी कवठेकर यांचा गुरुवारी जबाब नोंदवला आहे. एसआयटीकडून भरती प्रक्रियेतील या गैरप्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी समितीने केली आहे.
COMMENTS