भावाने बहिणीची निर्घृण हत्या केली आहे. बहिणीचे प्रेमप्रकरण मान्य नसल्याने भावाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
शिर्डीत ऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भावाने बहिणीची निर्घृण हत्या केली आहे. बहिणीचे प्रेमप्रकरण मान्य नसल्याने भावाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेतील आरोपी भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
मिळालेल्या महितीनुसार, ज्ञानेश्वरी कुलथे असे मुत्यू मुलीचे नाव आहे. आपल्या बहिणीचे प्रेमसंबंध समजल्यावर भाऊ आणि बहिणीत बराच वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. राग अनावर न झाल्याने निर्दयी भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची विचित्र पद्धतीने हत्या केली आहे. त्याने बहिणीच्या डोक्यात थेट सिमेंटचा पेव्हर ब्लॉक टाकला. यात १७ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
काल रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी भावाला शिर्डी पोलिसांनी येवला येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS