पारनेर। नगर सहयाद्री - स्व.आ. वसंतराव झावरे पाटील यांचे मोलाचे योगदान असणाऱ्या वासुंदे गावातील विकासकामाचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी कार्यक्रर...
पारनेर। नगर सहयाद्री -
स्व.आ. वसंतराव झावरे पाटील यांचे मोलाचे योगदान असणाऱ्या वासुंदे गावातील विकासकामाचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी कार्यक्रर्त्याचा मार्फत श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे प्रतिपादन सुंमन भाऊसाहेब सेंद, शंकर मनोहर बर्वें, नारायण झावरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
झावरे परिवाराचे मोलाचे यॊग्यदान असणाऱ्या वासुंदे गावाच्या रखडलेल्या विकास कामासाठी वासुंदे, वडगाव,सावताळ या ग्रामस्थानी शनिवारी भरणाऱ्या ग्राम दरबारात मागणी केली होती. केलेल्या मागणीचा सुजित झावरे पाटील यांनी विखे पाटील यांच्याशी संपर्क साधत सातत पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. निधी मंजूर होताच लोकप्रतिनिधींच्या गावांतील कार्यक्रर्त्यानी हे आमच्यामुळे मंजूर झाले असल्याचे म्हणत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.
ग्रामपंच्यात निवडणुकीमध्ये स्वतःच्या गाडीतून दारू व मटण वाटणाऱ्याना गावकऱ्यानी झावरे कुटूंबावर असलेली श्रद्धा दाखवली होती. दुसर्यांनी केलेल्या कमावरती बोर्डे लावण्याचे काम लोकांप्रतीनी करत असतात. एक संस्थाचालक पाच कोटी रुपयांचा बंगला बांधतो हे कस शक्य आहे. अतिक्रमणात आसलेल्या संस्थमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करत लोकांच्या पैशावर किती दिवस पोट भरणार आहेत. जो माणुस गावांतील सत्ता नसताना हि कोणत्याही पदावर नसताना करोडो रुपयांची कामे मंजूर करून आणतो त्याला त्रास देण्याचे काम हे करतात. हे हंग्यात चालेल वासुंदयात नाही. या पुढे जशास तसे उत्तर देणार असल्याचे सरंपच सुनम भाऊसाहेब सैद तसेच उपसरंपच शंकर बर्वे, सोसायटी चेअरमन नारायण झावरे यांनी सांगितले.
COMMENTS