दीपक पवार, बा. ठ. झावरे, कारभारी पोटघन, राहुल झावरेंची नावे चर्चेत पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे य...
दीपक पवार, बा. ठ. झावरे, कारभारी पोटघन, राहुल झावरेंची नावे चर्चेत
पारनेर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांची बाजार समितीचे सभापतीपदी वर्णी लागताच राष्ट्रवादीचा नवीन तालुकाध्यक्ष कोण, याची चर्चा रंगली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार नीलेश लंके नवीन तालुकाध्यक्षची निवड करणार असून यामध्ये प्रामुख्याने सुपा गटातील माजी उपसभापती दीपक पवार, गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा. ठ. झावरे, आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव कारभारी पोटघन व प्रतिष्ठानचे पदाधिकारी माजी सरपंच राहुल झावरे यांची नावे चर्चेत आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व आमदार नीलेश लंके सर्वसामावेशक नेतृत्वाच्या गळ्यात तालुकाध्यक्षपदाची माळ टाकण्याची शयता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचे दावेदार सध्या तालुयात अनेक आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुपा गटातील दीपक पवार यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांचे वडील दिवंगत माजी सभापती पोपटराव पवार यांचे सुपा गटातील प्रस्थ ही जमेची बाजू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीत नवीन चेहर्यांना संधी..
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांना भाकर फिरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नवीन चेहर्यांना संधी मिळण्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यास-मोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस संघटनात्मक पातळीत मोठे बदल होण्याची शयता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व आमदार नीलेश लंके कोणाला संधी देतात याकडे तालुयाचे लक्ष लागले आहे.
दीपक पवार यांना मानणारा तरुण वर्ग सुपा गावात व परिसरात असून त्यांना संधी मिळू शकते असा चर्चेचा सूर आहे. दुसरीकडे आमदार नीलेश लंके यांचे विश्वासू व लंके प्रतिष्ठानचे प्रमुख कारभारी पोटघन यांचे नाव चर्चेत असून आमदार नीलेश लंके यांच्या अनेक निवडणुका व मोठे कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये त्यांचा मोठा हात आहे. आजी-माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम तालुयात राबवत असतात. या संघटनेनेही कारभारी पोटभर मेजर यांना संधी देण्याची मागणी आमदार लंके यांच्याकडे केली आहे.
वासुंदे गावातील गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा. ठ. झावरे यांचे नाव चर्चेत असून प्राथमिक शिक्षक बँक व शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्यांचा शिक्षकांशी दांडगा संपर्क आहे. सहकारातील आदर्श काम त्यांनी उभे केले आहे. भाजपचे नेते सुजित झावरे यांना शह देण्यासाठी आमदार लंके बा. ठ. झावरे यांच्या नावाचा विचार करू शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे. वनकुटे गावचे माजी सरपंच व नीलेश लंके प्रतिष्ठानचे राहुल झावरे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आमदार लंके त्यांना संधी देऊ शकतात, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे या तालुकाध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गजांची नावे स्पर्धेत येऊ शकतात.
COMMENTS