श्रीगोंदा | नगर सह्याद्री :- श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नागवडे-पाचपुते यांनी एकत्र येऊन माजी आमदार राहुल जगताप यांच्य...
श्रीगोंदा | नगर सह्याद्री :-
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नागवडे-पाचपुते यांनी एकत्र येऊन माजी आमदार राहुल जगताप यांच्या विरोधात बंड पुकारले होते. मात्र या बंडाला राहूल जगताप यांनी शह देत तब्बल ११ उमेदवार निवडून आणले. तर नागवडे-पाचपुते गटाचे फक्त सात उमेदवार निवडून आले होते. आज झालेल्या सभापती, उपसभापती निवडीत पुन्हा राष्ट्रवादीने मुसंडी मारली असून सभापती आणि उपसभापती ही पदे राष्ट्रवादीच्याच ताब्यात आल्याने श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचेच झेंडा फडकवला आहे.
राज्यात नेतृत्व करणारे पाचपुते आणि नागवडे एकत्र येऊन राहुल जगताप यांना एकट पाडून कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची बनवली होती. मात्र या निवडणुकीमध्ये राहुल जगताप यांनी पाचपुते-नागवडे गटाला चारी मुंड्या चितपट करत तब्बल ११ उमेदवार निवडून आणले. तर नागवडे पाचपुते गटाला सात जागा मिळाल्या आहेत. आज सभापती आणि उपसभापती निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सकाळी ११ वाजता निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज स्विकृतीनंतर त्या अर्जांची छाननी करण्यात आली.
सभापतीपदासाठी जगताप गटाकडून लोखंडे अतुल लक्ष्मण व नागवडे-पाचपुते गटाकडून प्रशांत दत्तात्रय उगले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर उपसभापती पदासाठी जगताप गटाकडून मगर मनिषा योगेश व नागवडे-पाचपुते गटाकउून नलगे लक्ष्मण विठ्ठल यांनी अर्ज दाखल केले होते. सभापती पदाच्या निवडीत लोखंडे यांना १० तर उगले यांना ८ मते मिळाली. तर उपसभापती पदाच्या निवडणुकीमध्ये मगर मनिषा योगेश विजयी झाल्या. सभापती, उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली.
COMMENTS