पारनेर बाजार समिती संचालकपदी निवड झाल्याबद्दल ’अर्बन’च्या संचालक मंडळाच्या वतीने सत्कार अहमदनगर | नगर सह्याद्री अशोक कटारिया हे सहकारी बँकी...
पारनेर बाजार समिती संचालकपदी निवड झाल्याबद्दल ’अर्बन’च्या संचालक मंडळाच्या वतीने सत्कार
अहमदनगर | नगर सह्याद्री
अशोक कटारिया हे सहकारी बँकींग तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भरीव कार्य करीत आहेत. वीस वर्षांपासून ते पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून ते बाजार समितीतील व्यापार्यांचे प्रश्न सोडवताना शेतकर्यांचा समस्याही पोटतिडकीने सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांची बाजार समिती संचालकपदी झालेली निवड कौतुकास्पद आहे. चांगल्या कामाची पोचपावती त्यांना मतदारांनी दिली आहे्. अर्बन बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ते सर्व सहकारी संचालकांना बरोबर घेऊन विशेष प्रयत्न करीत आहेत, असे प्रतिपादन नगर अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन दीप्ती गांधी यांनी केले.
पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत आ.निलेश लंके व माजी आ. विजय औटी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये व्यापारी मतदारसंघातून अशोक कटारिया मोठ्या मताधियाने विजयी झाले. या विजयाबद्दल त्यांचा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संचालक ड. संपतलाल बोरा, मनेष साठे , ईश्वर बोरा, अजय बोरा, गिरीष लाहोटी, राहुल जामगांवकर, संगिता गांधी, शैलेश मुनोत, अनिल कोठारी, प्र.व्यवस्थापक सतिष रोकडे, सहाय्यक व्यवस्थापक सुनील काळे, सहाय्यक प्रमुख व्यवस्थापक मारूती औटी, गणेश उभेदळ, बोर्ड सेक्रेटरी प्रितम लोढा आदी उपस्थित होते.
चेअरमन अशोक कटारिया म्हणाले की, संचालक मंडळाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सर्व व्यापारी बंधूंनी विश्वास दाखवून विजयी केले. याबद्दल अर्बन बँकेतील सहकार्यांनी केलेला सत्कार आनंददायी आहे. बाजार समितीत चांगले योगदान देतानाच अर्बन बँकेलाही पुन्हा दिमाखात उभे करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही कटारिया यांनी दिली.
COMMENTS