नागपूर। नगर सहयाद्री - भिवापूरमधील पेट्रोल पंपवर लुटमार करून पंपमालकाच्या हत्याकांडाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. वडिलांचे बाहेर ...
नागपूर। नगर सहयाद्री -
भिवापूरमधील पेट्रोल पंपवर लुटमार करून पंपमालकाच्या हत्याकांडाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. वडिलांचे बाहेर तीन ते चार महिलांशी अनैतिक संबंध तसेच घरी आई व बहिणीला मारहाण करीत शारीरीक व मानसिक त्रास देणाऱ्या वडिलाचा ५ लाखांची सुपारी देऊन खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी हत्याकांडात मुख्य आरोपी म्हणून मुलीला आरोपी केले आहे. प्रिया किशोर माहुरतळे-सोनटक्के असे आरोपी मुलीचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, भीवापूरमधील पाटील पेट्रोल पंपवर दिलीप राजेश्वर सोनटक्के (५०, दिघोरी) यांचा दुचाकीने आलेल्या तीन लुटून खून केला. मात्र, हे हत्याकांड लुटमारीतून नसून सुपारी देऊन केल्याचा संशय पोलिसांना होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे आणि ठाणेदार जयपालसिंह गिरासे यांनी मुख्य आरोपी शेख अफरोज (मोठा ताजबाग) याला अटक केली.
मात्र, पोलिसांना वेगळाच संशय होता. दिलीप सोनटक्के यांचे बाहेर तीन ते चार महिलांशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे ते नेहमी त्या महिलांच्या घरी मुक्कामी राहत होते.पत्नीला मारहाण करत प्रिया आणि तिची घटस्फोटीत बहिण या दोघींनाही मारहाण करीत अश्लील शिवीगाळ करीत होता. दारुडा असलेल्या दिलीप यांना त्रास दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे वडिलाचा काटा काढण्याचा कट मोठी मुलगी प्रिया हिने आखला.
प्रियाच्या घरात फरशीचे काम करण्यासाठी शेख अफरोज याला ठेका दिला होता. त्याच्याशी प्रियाची ओळख झाली होती. त्यामुळे प्रिया आणि अफरोज एकमेकांच्या संपर्कात होते. तिने वडिलांना खून करण्यासाठी ५ लाख रुपयांत सुपारी दिली होती. कटानुसार लुटमार करण्याच्या उद्देशाने पेट्रोल पंपवर गेलेल्या अफरोज आणि त्याच्या तीन साथिदारांनी दिलीप यांचा खून केला.
COMMENTS