अहमदनगर | नगर सह्याद्री आठवीत शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून नेहमी छेड काढणार्या युवकाविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
आठवीत शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून नेहमी छेड काढणार्या युवकाविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोल्हेगाव उपनगरात राहणार्या पीडित अल्पवयीन मुलीने यासंदर्भात सोमवारी फिर्याद दिली आहे.
अंचित (पूर्ण नाव माहिती नाही, रा. बोल्हेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी मार्च २०२३ मध्ये नेहमी प्रमाणे सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास राहत्या घरून शाळेत गेली. तेथे दुपारी जेवणाची सुट्टी झाल्याने शाळेच्या परिसरात मैत्रिणीसह जेवण करण्यासाठी बसलेली असताना अंचित जवळ आला व म्हणाला, ‘तुझा मोबाईल नंबर दे, तू मला आवडतेस’. फिर्यादी मुलगी घाबरून वर्गात निघून गेली व घरी गेल्यानंतर आईला सर्व प्रकार सांगितला.
दरम्यान सोमवारी रात्री दीड वाजता फिर्यादी मुलीसह तिच्या घरातील सर्व घरी झोपलेले असताना त्यांच्या मोबाईल नंबरच्या व्हॉटसअॅपवर एका नंबरवरून व्हिडीओ कॉल आला. तसेच मेसेज आले. घरातील सर्व जागे झाले असता सदरचा कॉल व मेसेज अंचित याने केल्याचे समोर आले. त्यानंतर अल्पवयीन मुलीने नातेवाईकांसह तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.
COMMENTS