नवी दिल्ली वृत्तसंस्था- मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये मंगळवारी सकाळी ८.४० च्या सुमारास एक बस ५० फूट उंच पुलावरून नदीत कोसळली. खरगोनचे एसपी धरमव...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये मंगळवारी सकाळी ८.४० च्या सुमारास एक बस ५० फूट उंच पुलावरून नदीत कोसळली. खरगोनचे एसपी धरमवीर सिंह यांच्या माहितीनुसार या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी झालेत. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही १५ प्रवाशांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. जखमींना लगतच्या रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आलेत.
अपघातग्रस्त बस डोंगरगाव ते दसंगा दरम्यानच्या बोराड नदीच्या पुलाचा कठडा तोडून कोरड्या नदीत कोसळली. घटनास्थळी रुग्णवाहिका व प्रशासनाचे अधिकारी आहेत. आयजी राकेश गुप्ता यांच्या माहितीनुसार, बस खरगोनच्या बेजापूरहून इंदूरच्या दिशेने जात होती. वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. नदी कोरडी असल्यामुळे अपघाताची तिव्रता वाढली. या घटनेत १५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आले.
डोंगरगाव येथील राज पाटीदार यांनी सांगितले की, माँ शारदा ट्रॅव्हल्समधून ५० ते ५५ प्रवाशी प्रवास करत होते. अपघातानंतर डोंगरगाव व लोणारा गावातील ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी काचा फोडून जखमींना बसमधून बाहेर काढले. बस अत्यंत भरधाव वेगाने जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. खरगोन बस दुर्घटनेत मृत्यू पडलेल्यांच्या कुटुंबियांना मध्य प्रदेश सरकारने प्रत्येकी ४ लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार व किरकोळ जखमींना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
COMMENTS