यवतमाळ। नगर सहयाद्री - यवतमाळ शहरातील अशोकनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.आठ वर्षांच्या मुलासह आईने गळफास लावत आत्महत्या केली आहे. घट...
यवतमाळ। नगर सहयाद्री -
यवतमाळ शहरातील अशोकनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.आठ वर्षांच्या मुलासह आईने गळफास लावत आत्महत्या केली आहे. घटनेमुळे परिसर हादरला आहे.रेश्मा वंडकर (३८), पूर्वेश वंडकर (८) असे मृत आई व मुलाचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रोड, परिसरातील कोल्हेवाडी, येथील ते मुळ रहिवासी असून ते सध्या यवतमाळमधील अंबिकानगर येथे वास्तव्यास होते.आज सकाळच्या सुमारास रेश्मा व मुलगा पुर्वेश हे दोघे गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले.
सदर घटनेबाबत परिसरातील नागरीकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करत तपास सुरू केला आहे. मात्र रेश्मा वंडकर यांनी आत्महत्या का केली? याबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.
COMMENTS