अहमदनगर | नगर सह्याद्री शेतात जाणार्या रस्त्याच्या वादातून खातगाव टाकळी (ता. नगर) येथे दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना बुधवारी (दि. १७...
अहमदनगर | नगर सह्याद्री
शेतात जाणार्या रस्त्याच्या वादातून खातगाव टाकळी (ता. नगर) येथे दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना बुधवारी (दि. १७) सायंकाळी घडली. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील प्रत्येकी एक जखमी झाला. परस्पर विरोधी फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
जखमी बाबासाहेब रंगनाथ कुलट (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरद लहानु कुलट, विकास लहानु कुलट, मेघा विकास कुलट, सीमा शरद कुलट यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबासाहेब यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मी व पत्नी संगिता शेतातून घरी जात असताना शेतात जाणार्या रस्त्याच्या वादाच्या कारणावरून शरद, विकास, मेघा व सीमा यांनी रस्ता आडवून शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
शरदने कोयत्याने माझ्या डोयात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच भांडण सोडविण्याकरीता आलेला चुलत भाऊ दौलत कुलट व भावजाई सुजता कुलट यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
दुसर्या कुटुंबातील जखमी शरद लहानु कुलट (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबा रंगनाथ कुलट, मंदाबाई रंगनाथ कुलट, विद्या बाबु कुलट, गंगाधर नाना कुलट, चंदाबाई गंगाधर कुलट, दौलत गंगाधर कुलट, आशा दौलत कुलट, सिंधुबाई हरिभाऊ कुलट, विष्णू हरिभाऊ कुलट, उत्तम बबन कुलट, सुजाता विष्णू कुलट, रामेश्वरी उत्तम कुलट, रावसाहेब सुखदेव कुलट, प्राची प्रविण कुलट यांच्याविरूद्द शिवीगाळ, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शरद यांनी फिर्यादीत म्हटले, की बुधवारी सायंकाळी पाच वाजता बाबा व दौलत यांनी तू आमचा रस्ता का आडवला, असे म्हणून शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. गंगाधर, रावसाहेब, उत्तम, विष्णू यांनी दगडाने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या भाऊ विकास तसेच सीमा, मेघा, पुजा यांनाही मंदाबाई, विद्या, गंगाधर, चंदाबाई, दौलत, आशा, सिंधूबाई, विष्णु, उत्तम, सुजाता आदींनी लाकडी काठ्यांनी व दगडांनी मारहाण केली.
COMMENTS