बुलढाणा। नगर सहयाद्री - बुलढाणा मधील सिंदखेडराजा तालुक्यात एक अपघात घडल्याची बातमी समोर अली आहे..नागपूर-पुणे महामार्गावर पळसखेड चक्का या गाव...
बुलढाणा। नगर सहयाद्री -
बुलढाणा मधील सिंदखेडराजा तालुक्यात एक अपघात घडल्याची बातमी समोर अली आहे..नागपूर-पुणे महामार्गावर पळसखेड चक्का या गावानजिक भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ८ ठार १२ जखमी झाले आहे. जखमी झालेल्या लोकंना तात्काळ सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णाल्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,संभाजीनगर बसस्थानकातून वाशिमच्या दिशेने जात असणाऱ्या बसला सकाळी ६ च्या सुमारास एका भरधाव ट्रकने जोरदार धडक झाली. भीषण अपघातात एसटी आणि ट्रक या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १२ प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
मृतांचा आकडा आणखी वाढणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.अपघाताच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आहेत. तसंच मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
COMMENTS