गुजरात टायटन विरुद्ध चेन्नई, लखनौ सुपरजायंटस विरुद्ध मुंबई मुंबई | नगर सह्याद्री ‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल) ५१ दिवस आणि ७० सामन्यांनंत...
गुजरात टायटन विरुद्ध चेन्नई, लखनौ सुपरजायंटस विरुद्ध मुंबई
मुंबई | नगर सह्याद्री
‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल) ५१ दिवस आणि ७० सामन्यांनंतर ४ प्लेऑफ संघ सापडले आहेत. लीग स्टेजच्या समाप्तीनंतर गुजरात टायटन्स प्रथम, चेन्नई सुपर किंग्स द्वितीय, लखनऊ सुपरजायंट्स तृतीय आणि मुंबई इंडियन्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
क्वालिफायर-१ मध्ये जीटी आणि सीएसके यांच्यात २३ मे रोजी, तर एलिमिनेटर सामना २४ मे रोजी एलएसजी आणि एमआय यांच्यात खेळवला जाईल. दोन्ही सामने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या १४ मोसमात १२ व्यांदा प्लेऑफ गाठले आहे. मुंबई ५ वेळा चॅम्पियन असून १० व्यांदा टॉप चारमध्ये स्थान मिळवले आहे. गतविजेते गुजरात आणि लखनऊने २०२२ मध्ये पहिल्यांदाच समावेश केल्यानंतर सलग दुसर्या सत्रात प्लेऑफमध्ये प्रवेश केला.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स २० गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहे. संघाने १४ पैकी १० सामने जिंकले आणि ४ सामने गमावले. २३ मे रोजी त्यांचा सामना सीएसकेशी होईल. या संघाने प्लेऑफमध्ये आतापर्यंत चेन्नईविरुद्ध एकही सामना खेळलेला नाही. साखळी टप्प्यात दोघांमध्ये ३ सामने झाले आणि तिन्ही सामने गुजरातने जिंकले. चेन्नई सुपर किंग्ज १७ गुणांसह गुणतालिकेत क्रमांक २ वर आहे. संघाने १४ पैकी ८ सामने जिंकले, ५ गमावले आणि एक अनिर्णित राहिला.
उडघ २०२० आणि २०२२ हंगामात केवळ २ वेळा स्पर्धेत टॉप-४ मध्ये स्थान मिळवू शकले नाही. दोन्ही वेळा संघ दुसर्या शेवटच्या स्थानावर होता. पण २०२१ मध्ये त्याने ट्रॉफी जिंकली. २०२२ मध्येही, १० संघांच्या गुणतालिकेत ९व्या क्रमांकावर राहिल्यानंतर, या वर्षी संघ पुन्हा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.
कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपरजायंट्सने १७ गुणांसह तिसरे स्थान पटकावले. त्यांनी १४ पैकी ८ सामने जिंकले, ५ गमावले आणि एक अनिर्णित राहिला. गुजरातप्रमाणेच सुपरजायंट्सनेही सलग दुसर्या सत्रात प्लेऑफमध्ये प्रवेश केला. गेल्या मोसमात एलिमिनेटरमध्ये आरसीबीकडून पराभूत झाल्याने एलएसजी अंतिम शर्यतीतून बाहेर पडला होता. चेन्नईच्या मैदानावर २४ मे रोजी एलिमिनेटरमध्ये ५ वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. दोघेही प्लेऑफमध्ये प्रथमच आमनेसामने असतील. साखळी टप्प्यात दोन्ही संघांमध्ये ३ सामने झाले आणि तिन्ही लखनऊने जिंकले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स १६ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी १४ पैकी ८ सामने जिंकले आणि ६ गमावले. आता त्यांचा सामना लखनऊ सुपरजायंट्सशी होणार आहे.
COMMENTS