पारनेर | नगर सह्याद्री तालुयातील भाळवणी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावासह वाड्यावर त्यावरील जो कचरा संकलित केला जातो. तो कचरा कापरी नदीत ...
पारनेर | नगर सह्याद्री
तालुयातील भाळवणी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावासह वाड्यावर त्यावरील जो कचरा संकलित केला जातो. तो कचरा कापरी नदीत टाकला जात आहे. त्यामुळे या ओल्या व सुया कचर्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण झाली असून याचा त्रास रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयामध्ये शिक्षण घेत असणार्या विद्यार्थ्यांना व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे. त्यामुळे हा कचरा डेपो तातडीने आठ दिवसात हलवण्यात यावा अन्यथा उपोषण करण्याचा लेखी इशारा अशोक शिवाजी रोहोकले, संदीप प्रभाकर रोहोकले, पुरुषोत्तम बाबाजी गोडसे, अमोल पाराजी रोहोकले यांनी दिला आहे.
कापरी नदीत टाकलेल्या कचर्यामुळे ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोयात आले आहे. येत्या २८ मे पर्यंत याबाबत ठोस भूमिका आपल्या प्रशासानाकून घेण्यात यावी नाही तर सोमवार दिनांक २९ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता आम्ही सर्व त्रस्त नागरिक आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे या लेखी निवेदनात त्यांनी म्हटले आहे.
भाळवणी गावातील औद्योगिक वसाहत व राष्ट्रीय महामार्गच्या लगत वसलेले महत्वाचे बाजारपेठेचे गाव असून दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असलेले गाव आहे. आपल्या गावात जमा झालेला ओला व सुका कचरा महात्मा फुले विद्यालय व जि. प. प्राथमिक शाळेच्या पाठीमागे कापरी नदी किनारी ग्रामपंचायत मार्फत टाकला जातो. यामध्ये अनेक प्रकाचा आरोग्यास धोकादायक कचराही आहे. या कचर्याचे विघटन होईल अशी कुठलीही व्यवस्था या ठिकाणी नाही. हा कचरा या ठिकाणीच जाळला जातो.
गावठाणातील वस्तीच्या ठिकाणापासून तसेच शाळेपासून कचरा डेपोचे अंतर खूप जवळ असल्याने कचरा डेपो असल्याने विषारी धुरामुळे हजारो विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे. भाळवणी येथील औद्योगिक वसाहती तील प्लास्टिक आणि केमिकल कचरा आणून टाकला जातो. गेले कित्येक वर्ष हा प्रकार या ठिकाणी चालू असल्याने प्लास्टिक कचरा जाळणे हा अतिशय गंभीर प्रकार असून त्यामुळे स्थानिकांना आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत आहेत. नदीच्या कडेलाच हा कचरा असल्याने नदीचे पाणीही दुषित होत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही या समस्येकडे आपले लक्ष वेधत आहोत.
परंतु याबाबत कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येत नाही. तसेच भाळवणी गावात असलेल्या विविध चिकन शॉपचा कचराही याच परिसरात टाकण्यात येतो. परिणामी सर्वत्र दुर्गंधी पसरते व भटया कुत्र्यांच्या हैदोसमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. प्राणी व पक्षी हा कचरा गावा विविध ठिकाणी पसरवित आहे. त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ त्रस्त आहोत. नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र असल्याने आंदोलन प्रसंगी काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील. तरी याबाबत ताबडतोब योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
COMMENTS