निघोज | नगर सह्याद्री हिंदू धर्म संस्कृती ही जगाची ऐतिहासिक जननी असून हिंदू धर्म संस्कृती माध्यमातून जनकल्याण होणार आहे. हा विशाल दृष्टिकोन ...
निघोज | नगर सह्याद्री
हिंदू धर्म संस्कृती ही जगाची ऐतिहासिक जननी असून हिंदू धर्म संस्कृती माध्यमातून जनकल्याण होणार आहे. हा विशाल दृष्टिकोन ठेवून छत्रपती संभाजी महाराज यांचे ऐतिहासिक योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते मोहन माने यांनी व्यक्त केले आहे.
सकल हिंदू समाज, निघोज ग्रामस्थ, शिवबा संघटना पारनेर तालुका पत्रकार संघ, जय मल्हार देवस्थान ट्रस्ट, आपला गणपती समाजसेवा प्रतिष्ठान, अल्पसंख्याक समाज मंडळ, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, जय मल्हार मंडळ, आपली माती आपली माणसं समाजसेवी संस्था, यांनी आयोजित केलेल्या खंडोबा मंदीर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या शिवव्याख्यानात माने हे बोलत होते. मंडळातील सदस्यांनी वढू बुद्रुक येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थानाचे दर्शन घेउन ज्योत आणली. या ज्योतीचे निघोज येथे मिरवणूक काढीत ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले, हनुमान मंदिर, मंळगंगा मंदीर, खंडोबा मंदिर या ठिकाणी ज्योतीचे पुजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच जय बजरंगबली, मंळगंगा देवी, यळकोट यळकोट जय मल्हार या घोषनांनी आसमंत निनादला होता.
सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत डॉ. प्रविण बढे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. पन्नास पेक्षा जास्त लोकांनी या मोफत शिबीराचा लाभ घेतला. सायंकाळी सात वाजता खंडोबा मंदिरापासून वाजत गाजत डि जे च्या तालावर नाचत शंभूप्रेमी सैनिकांनी मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या ट्रॅटरवर छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य प्रतिमा उभी करण्यात आली होती. खंडोबा मंदिर, एस टी बस स्थानक, मंळगंगा मंदीर, जूनी पेठ, ग्रामपंचायत चौक, मशीदी परिसर, हेमांडपंथी बारव ते खंडोबा मंदिर मिरवणुकीत शेकडो शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषनांनी आसमंत निनादला होता. फटायांची आतषबाजी करीत आकाशातही विजा चमकाव्यात अशा प्रकारे आनंदमय वातावरण निर्मिती करण्यात आली होती.
यावेळी ओंकार रणसिंग व त्यांच्या सहकार्यांनी शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळ दाखवीत उपस्थीतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्वराज्य काळातील विरपुरुषांचे व महिलांचे दर्शन घडवीले. यावेळी डॉ. भास्करराव शिरोळे, अध्यक्ष सचिन पाटील वराळ, अध्यक्ष मंगेश लाळगे, शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद, अस्लमभाई इनामदार, अध्यक्ष रवि रणसिंग, कार्याध्यक्ष महेश ठाणगे, सचिव सचिन लंके, सतिष साळवे, मनोहर राउत, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती संघाचे पदाधिकारी भास्करराव सोनवणे, व त्यांचे सर्व सहकारी या मिरवणुकीत अग्रभागी होते. अ यावेळी परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाने या दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
COMMENTS