पुणे | नगर सहयाद्री - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचं नाव चर्चेत होतं. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी य...
पुणे | नगर सहयाद्री -
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचं नाव चर्चेत होतं. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी या निवडणुकीत नसल्याचं स्पष्ट जाहीर केलं. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पंतप्रधान पदाच्या निवडणुकीसाठी घेतलं जात आहे. परंतु, मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
शरद पवार यांचा राष्ट्रीय राजकारणात दबदबा आहे.त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जर विरोधकांच्या ऐक्याला बळ मिळालं तर शरद पवार पंतप्रधानांचा चेहरा असतील, अशी चर्चा आहे. परंतु, या सर्व चर्चा शरद पवारांनी धुडकावून लावल्या आहेत. काल पुण्यात बालगंधर्व मंदिर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा खुलासा केला आहे.
पवार म्हणाले, पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी अजिबात नाही. या देशासाठी आम्हाला स्थिर आणि विकासाला चालना करणारे नेतृत्व हवे आहे. उद्या जनता ज्यांना उत्तम प्रकारची साथ देईल त्यातून असे नेतृत्व काढता येईल. अशा नेत्यांना पूर्ण साथ देणे आणि मदत करणे ही माझ्यासारख्या नेत्याची जबाबदारी आहे. मी पुढची निवडणूकच लढवणार नाही, त्यामुळे पंतप्रधान पदाचा संबंधच येत नाही.
COMMENTS