अहमदनगर। नगर सहयाद्री - अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील वाद चांगलाच ग...
अहमदनगर। नगर सहयाद्री -
अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील वाद चांगलाच गाजत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सत्ताधारी-विरोधक ऐवजी सत्ताधारी पक्षामध्येच जुंपल्याचे चित्र आहे. यावर राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते नेमके कोणाच्या बाजूने उभे राहतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले होते.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी व्हीआयपी विश्रामगृहाचे भूमिपूजन केल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यासाठी पोहचले होते. यावेळी त्यांच्यासोबत विखे पाटील यांच्यासह राम शिंदे आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार, खासदार उपस्थित होते.
जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरुन राधाकृष्ण विखे आणि राम शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली होत. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे अल्पावधीच या ठिणगीने आगीचे रुप धारण केले होते. राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. राधाकृष्ण विखेंनी बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे, असा राम शिंदेंचा आरोप केला होता
राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, म्हणून तर दोघांना सोबत घेऊन बसलो ना. समन्वयचं आहे, काही काळजी करु नका. काही वाद नाहीत. वाद असले तरी वादळ नाही, चिंता करु नका. चहाच्या पेल्यातील वादळ आता संपलेलंं आहे, असे ते यावेळी म्हणाले आहे.
COMMENTS