मुंबई। नगर सहयाद्री - बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी अभिनेत्री चाहत्यांमध्ये चर्चेत असते. करिश्माने १९९१ साल...
मुंबई। नगर सहयाद्री -
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी अभिनेत्री चाहत्यांमध्ये चर्चेत असते. करिश्माने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम कैदी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कपूर कुटुंबाची लेक मोठ्या पडद्यावर आल्यानंतर चाहत्यांनी तिला भरभरून प्रेम दिलं. ९० च्या दशकात अभिनेता गोविंदा याच्यासोबत करिश्माची जोडी हीट ठरली. राजा बाबू, साजन चले ससुराल यांसारख्या सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. दोघांच्या जोडीची कमाल बॉस ऑफिसवर दिसून आली.
चाहत्यांनी करिश्मा आणि गोविंदा यांच्या जोडीला डोयावर घेतलं. गोविंदासोबत करिश्माचं करियर यशाच्या शिखरावर पोहोचलं होतं. पण बॉलिवूडमध्ये असलेलं अभिनेत्रीचं स्थान करिश्माला आनंद आणि समाधान देणारं नव्हतं. मीडिया रिपोर्टनुसार, करिश्माला ज्या ओळखीची गरज होती, ती ओळख आणि प्रसिद्धी अभिनेत्रीला गोविंदा याच्यासोबत मिळत नव्हती. तेव्हा अभिनेत्री जुही चावला, रवीना टंडन यांचा काळ होता. बॉलिवूडमध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला आणि तो तिच्या करियरसाठी लाभदायक ठरला. गोविंदा याच्यासोबत सिनेमांमध्ये काम न करण्याचा निर्णय तिने घेतला.
या निर्णयानंतर करिश्मा आणि गोविंदा यांच्यात दुरावा आला. करिश्माला वाटलं की जर तिला अव्वल अभिनेत्रींच्या यादीत सामील व्हायचं असेल तर तिला बॉलिवूडच्या तिन्ही खानासोबत काम करावे लागेल आणि तिने तसं केलं. करिश्माने सलमान, शाहरुख आणि आमिर खान यांच्यासोबत हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. करिश्मा आमिर याच्यासोबत ‘राजा हिंदुस्तानी’, शाहरुख खानसोबत ‘दिल तो पागल है’ आणि ‘हम साथ साथ हैं’ सिनेमात सलमान खान याच्यासोबत दिसली.
COMMENTS