पुणे। नगर सहयाद्री - विधेच माहेरघर असलेल्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याची दगडाने ठेचून ह...
पुणे। नगर सहयाद्री -
विधेच माहेरघर असलेल्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात ही घटना घडली आहे .श्रीकांत मच्छिंद्र जाधव (रा.बिबवेवाडी, पुणे )असे मयत तुरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बिबवेवाडी परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली. श्रीकांत जाधव हा सामाजिक कार्यकर्ता होता. त्याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन काही दिवसांपूर्वी त्याने आरोपी सुनील पारेकरच्या घरासमोर शिवीगाळ केली होती. त्यामुळे सुनील पारेकरने श्रीकांतला दारू पिऊन याठिकाणी शिवीगाळ करू नको असे सांगितले. त्यानंतर बुधवारी रात्री श्रीकांतने दारू पिऊन पुन्हा सुनीलशी वाद घातला. त्यामुळे संतप्त झालेल्या सुनीलने आपल्या दोन मित्रांना बोलावून श्रीकांचा काटा काढण्याचे ठरवले.
सुनील आणि त्याच्या दोन मित्रांनी श्रीकांत जाधवला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी दगडाने ठेचून त्याची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. या घटनेनंतर बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. श्रीकांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुनील पारेकर आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
COMMENTS