मुंबई। नगर सहयाद्री - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहे. न्यायालयाच...
मुंबई। नगर सहयाद्री -
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहे. न्यायालयाच्या निकालाने शिंदे- फडणवीस सरकारला अभय मिळाल्यानंतर आत्ता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर आली नसून मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेसह संभाव्य मंत्र्यांची नावेही समोर आली आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे शिंदे- फडणवीस सरकारकडून सांगण्यात येत होते. ज्याची आता तारीखही समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे रखडलेल्या मंत्रि मंडळाचा विस्तार हा २३ किंवा २४ मे ला घेण्याची चर्चा दबक्या आवाजाने आमदारांमध्ये सुरू आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात पुढील नावे चर्चेत
भरत गोगवले( जलसंधारण मंत्री),
संजय शिरसाठ (परिवहन किंवा समाज कल्याण)
बच्चू कडू (दिव्यांग मंत्री)
प्रताप सरनाईक
सदा सरवणकर
यामिनी जाधव
अनिल बाबर
चिमन आबा पाटील
COMMENTS