श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुयातील लिंपणगाव येथे जमिनीच्या वादातून तिघांच्या अंगावर ट्रॅटर घालत तसेच तलवार, कोयता आणि लोखंडी टॉमीने मारहा...
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
तालुयातील लिंपणगाव येथे जमिनीच्या वादातून तिघांच्या अंगावर ट्रॅटर घालत तसेच तलवार, कोयता आणि लोखंडी टॉमीने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात सात जणांवर बापू बाबा माने यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला.
संतोष माणिक भोंडवे, सागर भिकाजी भोंडवे, प्रसाद माणिक भोंडवे, संदिप किसन सुर्यवंशी, किरण भिकाजी भोंडवे, प्रविण सोपानराव कुरूमकर (सर्व रा. लिंपणगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) व बापू लक्ष्मण कुरुमकर रा. मुंढेकरवाडी ता. श्रीगोंदा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.सविस्तर असे की फिर्यादी यांची लिंपणगाव शिवारात गट नं २३६ मध्ये शेत जमीन असून या शेत जमिनीत १ मे रोजी फिर्यादी हे गेले असता त्या ठिकाणी संतोष माणिक भोंडवे, बापू लक्ष्मण कूरूमकर आणि संदीप किसन सूर्यवंशी यांनी अनाधिकाराने बांबूची कांद्याची चाळ बांधून त्यात कांदे टाकले असल्याचे दिसून आले.
तसेच अतिक्रमण केले. माझे शेतात कांदे टाकू नका, वाहने उभी करू नका असे सांगितले असता या गोष्टीचा त्यांना राग आला. आरोपींनी फिर्यादीला शेतातून बाहेर हो असे सांगत शिवीगाळ करण्यास सुरुवात करत हातात दगड घेऊन तु इकडे आलास तर तुला जीवे मारू अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात दि.२ मे रोजी गुन्हा दाखल केला. फिर्यादी दि. ३ मे रोजी दुपारच्या सुमारास मुलगा उदय बापु माने व भाऊ हनुमान बाबा माने यांच्यासह शेतात गेले असता संतोष माणिक भोंडवे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर ट्रॅटर घातला असता फिर्यादीसह तिघांनी पळ काढला.
दरम्यान ट्रक्टरने चारचाकी वाहनाचे नुकसान केले. त्यावेळी संतोष माणिक भोडवे, सागर भिकाजी भोंडवे, प्रसाद माणिक भोंडवे, संदिप किसन सुर्यवंशी, किरण भिकाजी भोंडवे, व बापु लक्ष्मण कुरुमकर मुंढेकरवाडी हे तेथे आले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाचा आणि भावाचा मारण्यासाठी पाठलाग केला. या प्रकरणी पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत.
COMMENTS