नाशिक विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी सुपा | नगर सह्याद्री पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांची मानसिक आरोग्य तपासणी करुन शेतकर...
नाशिक विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
सुपा | नगर सह्याद्री
पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांची मानसिक आरोग्य तपासणी करुन शेतकर्यांची वेळोवेळी होत असलेली अवहेलाना थांबुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई होण्यासाठी आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे व सहकार्यांनी महसुलचे नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व उपायुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, अनेकवेळा शेतकर्यांचे शिवपाणंद, शेतरस्ते, पाझर तलाव दुरुस्तीचे प्रश्न शासन दरबारी मांडले. प्रश्न सुटेना म्हणुन आम्ही शेतकरी पारनेरचे तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांना भेटायला गेल्यावर व त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना तहसीलदार आमच्या अंगावर धावून मारायला येत होते. अत्यंत खालच्या स्तराच्या अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडून वेडे झालेल्या व्यक्ती सारखे ते वागत होते. सदरील अधिकार्यांचे वर्तन हे नेहमीच वेडे झालेल्या व्यक्ती सारखे असते.
त्यांना कुणी भेटायला गेले तरी ते त्या व्यक्तींच्या अंगावर शिव्या देत मारायला आल्यासारखे वर्तन करतात असा पारनेरकरांचा अनुभव आहे. त्यामुळे जनतेमध्ये, अधिकारी, कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. म्हणून तहसीलदार यांची मानसिक आरोग्य तपासणी चांगल्या डॉटरांच्या टीम कडून करून घ्यावी व त्यांच्यावर ताबडतोब उपचार करावा असे आम्ही या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,थोर समाजसेवक अण्णा हजारे, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य,अहमदनगर जिल्हाधिकारी, अहमदनगर जिल्हा आरोग्य अधिकारी अहमदनगर, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार निलेश लंके आदींना दिल्या आहेत.
COMMENTS