निघोज | नगर सह्याद्री सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी महानगर बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी फार मोठे साम्राज्य ...
निघोज | नगर सह्याद्री
सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी महानगर बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी फार मोठे साम्राज्य उभे केले असून गीतांजली शेळके यांनी सर्व दुख विसरुन हे साम्राज्य संभाळण्याची जबाबदारी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.
पाणी फौंडेशन माध्यमातून राबवलेल्या योजनेचा तालुयात प्रथम क्रमांक आला होता. बालेवाडी पुणे येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला मात्र अॅड. उदयदादा शेळके आजारी असल्याने पुरस्कार कार्यक्रमाला जाता आले नाही. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते हा पुरस्कार गीतांजली शेळके व पिंपरी जलसेन येथील ग्रामस्थांनी घेतला यावेळी हजारे बोलत होते.
आण्णा यावेळी म्हणाले उदय शेळके हे आजारामुळे आपल्यातून लवकर गेले. जिल्हा सहकारी बँकेची व जी एस महानगर बँकेची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. सहकारात आदर्श काम करण्याचे काम उदय शेळके यांनी अल्पावधीतच केले. सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी जी एस महानगर बँकेची स्थापना करुण अहमदनगर जिल्ह्यातील मुंबई स्थायीक जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ दिले.
राज्यात ही बँक अग्रणी राहिली. मुंबई बँक व राज्य सहकारी बँक माध्यमातून सहकार चळवळीत मोठ्या प्रमाणात योगदान देऊन राज्य विकासासाठी शेळके यांनी जिल्ह्याचा नावलौकिक देशात केला. त्यानंतर उदय शेळके यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेताना शिस्तप्रिय काम केले. शेळके साहेब यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. प्रत्येक महिन्याला ते एक ते दोन वेळा भेटून चर्चा करीत मार्गदर्शन घेत होते. मात्र आजारामुळे ते आपल्यातून लवकर गेले.
शेवटी ईश्वरी सत्तेपुढे ईलाज नाही. मात्र आपण सारी दुख विसरुन मुलींना शेळके यांच्या सारखे उच्च शिक्षीत करुण साहेबांचा नावलौकिक कायम राहण्यासाठी ही सर्व जबाबदारी संभाळण्याची गरज आहे. तुम्हाला कोनतीही आडचण आली तर आम्ही सक्षमपणे तुमच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही हजारे यांनी देत गीतांजली शेळके यांना आधार दिला आहे.
COMMENTS