उल्हासनगरात १२ वर्षीय मुलीची भावाकडून हत्या मुंबई। सहयाद्री - उल्हासनगरमध्ये एका १२ वर्षांच्या मुलीची तिच्या सख्ख्या भावानं निर्घृण हत्या क...
उल्हासनगरात १२ वर्षीय मुलीची भावाकडून हत्या
मुंबई। सहयाद्री -
उल्हासनगरमध्ये एका १२ वर्षांच्या मुलीची तिच्या सख्ख्या भावानं निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.मृत मुलगी तिचा भाऊ आणि वहिनीसोबत राहात होती. या मुलीला नुकतीच पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. पण तिच्या वहिनीनं त्यावरून आपल्या नवऱ्याला चुकीची माहिती दिली. त्यानंतर त्यानं कुणाशी तरी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून आपल्या बहिनीची हत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धक्कादायक घडनेत मृत्यू झालेली मुलगी आपला भाऊ आणि वहिनीसोबत उल्हासनगर येथे राहत होती. तर मुलीचे आई-वडिल गावी राहत होते. या मुलीला काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती. मात्र ते पाहून तिच्या वहिनीने नवऱ्याला चुकीची माहिती दिली.
तुमच्या बहिणीचे कुठेतरी प्रेमसंबंध असून त्यातून शारीरिक संबंध ठेवल्यानं हा रक्तस्त्राव होत असल्याचं वहिनीनं सांगितलं. मुलीचा मोठा भाऊ संतापला आणि तब्बल तीन दिवस त्यानं बहिणीला जबर मारहाण केली. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चटके दिले. यातच
१२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर भावानं स्वतःच तिला मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. तर तिचा पोस्टमॉर्टम केला असता त्यात तिच्या तोंडावर, मानेवर, पाठीवर चटके दिल्याच्या आणि मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळं डॉक्टरांनी याबाबत मध्यवर्ती पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
COMMENTS