अहमदनगर। नगर सहयाद्री - अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरामध्ये लहूजी सेवा मंडळाचे वतीने प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या डीजे ऑर्केस्...
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरामध्ये लहूजी सेवा मंडळाचे वतीने प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या डीजे ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या तालुक्यात गौतमी पाटील यांचे बनावट फेसबुक अकाऊंट चालवुन अश्लिल व्हिडीओ अपलोड करणारा अल्पवयीन तरुण सापडला त्याच शहरात गौतमी पाटील चा कार्यक्रम होतो हा योगायोग म्हणावा का ?
श्रीगोंदा शहरामध्ये लहूजी सेवा मंडळाचे वतीने मागासवर्गीय विद्यार्थी वस्तीगृहाच्या बांधकामासाठी सामाजिक हेतुने आर्थिकतेची मदत मिळविण्यासाठी भगवान गोरखे यांनी नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा लावणी व ऑर्केस्टाचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु रसिक मायबाप यांनी या सामाजिक हेतुकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे.
सोशल मीडियापासून ते प्रत्यक्ष शो मध्ये सर्वत्र गौतमीला बघायला येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की राडा हे समीकरण ठरलेलच आहे. या राड्यामुळे तरुणाईमध्ये चांगलीच खडाजंगी अनेक वेळा पहायला मिळते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांतून हुल्लडबाजी सुरू झाली.
पोलिसांनी प्रेक्षकांना शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र हुल्लडबाजी सुरूच राहिल्यावर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ आली. गाणं मध्येच थांबवून पोलिसांनी प्रेक्षकांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं. पण तरीदेखील हुल्लडबाजी सुरूच राहिल्यानं पोलिसांना अॅक्शन मोडवर यावं लागलं.
COMMENTS