अमरावती । नगर सहयाद्री - अमरावती जिल्ह्यतील येलकीपूर्णा येथील विवाह सोहळ्यात जेवलेल्या जेवणापासून २७ जणांना विष बाधा झाल्याचा प्रकार समोर ...
अमरावती । नगर सहयाद्री -
अमरावती जिल्ह्यतील येलकीपूर्णा येथील विवाह सोहळ्यात जेवलेल्या जेवणापासून २७ जणांना विष बाधा झाल्याचा प्रकार समोर आली आहे. रुग्णांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अनेक नातेवाईकांनीही रुग्णालय धाव घेतली.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,अमरावती जिल्ह्यतील येलकीपूर्णा येथे एका लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमात २७ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या वरात पंगतीत जेवल्यानंतर अनेकांची प्रकृती बिघडली.अचानक अस्वस्थ होऊन पोटदुखी, मळमळ,जुलाब होऊ लागल्याने सर्वांना तात्काळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तपासणी केली असता जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
२७ जणांना अन्नातून विषबाधा झाली. सर्वांवर उपचार सुरू असून रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णांना काही तास रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार कऱण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय नातेवाईकांनीही रुग्णालयात धाव घेत चौकशी केली.
COMMENTS