मुंबई। नगर सहयाद्री - आयपीएल २०२३ स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. गुजरातला विजय मिळवण्यासाठी १७३ धावांची गरज होती. मात्र ...
मुंबई। नगर सहयाद्री -
आयपीएल २०२३ स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. गुजरातला विजय मिळवण्यासाठी १७३ धावांची गरज होती. मात्र १५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईच्या विजयात ५ मिनिटांनीही मोठी भूमिका बजावली. डेथ ओव्हर्समुळे सामना अगदी जवळ आला होता, पण धोनीने ५ मिनिटे वाया घालवली नसती तर सामना चेन्नईच्या हातातून जाऊ शकला असता.
या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऋतुराज गायकवाडने ६६ धावांची खेळी केली. तर डेवोन कॉनव्हेने ४० धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजाने २२, अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडूने प्रत्येकी १७-१७ धावांचे योगदान दिले.चेन्नई सुपर किंग्ज संघाने ७ गडी बाद १७२ धावा केल्या.
गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना वृद्धीमान साहा अवघ्या १२ धावा करत माघारी परतला. तर शुभमन गिलने एकाकी झुंज देत ३८ चेंडूंचा सामना करत ४२ धावांची खेळी केली. शेवटी राशिद खानने ३० धावांचे योगदान दिले. मात्र गुजरातचा संघ विजयापासून १५ धावा दूर राहिला.
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२३ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. चेन्नईच्या विजयात ५ मिनिटांनीही मोठी भूमिका बजावली. डेथ ओव्हर्समुळे सामना अगदी जवळ आला होता, पण धोनीने ५ मिनिटे वाया घालवली नसती तर सामना चेन्नईच्या हातातून जाऊ शकला असता.
त्याला हवे असते तर तो इतर कोणत्याही गोलंदाजाला सांगून गोलंदाजी करू शकला असता, पण त्याला पथिरानाकडून १६ वे षटक टाकायचे होते. धोनीने चेन्नईला जिंकवण्यासाठी जे ठरवले होते तेच केले, जरी त्याला अंपायरशी झगडावे लागले तरी मागे हटला नाही. खरेतर, १६ व्या षटकाच्या आधी ५ मिनिटे खेळ थांबवला गेला. धोनी आणि स्क्वेअर लेग अंपायर यांच्यातील संभाषणामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला.
COMMENTS